ETV Bharat / bharat

भारतीयांबाबतच्या वादग्रस्त पोस्टनंतर मालदीव बॅकफूटवर, सरकारनं जारी केलं निवेदन - नरेंद्र मोदी लक्षद्वीप

Maldives India Row : मालदीवच्या राजकारण्यांनी भारताबाबत केलेल्या बेताल टिप्पण्यांनंतर मालदीव सरकारनं निवेदन जारी करून सफाई दिली आहे. "या टिप्पण्या मालदीव सरकारच्या विचारांचं प्रतिनिधित्व करत नाहीत", असं या निवेदनात म्हटलंय.

Maldives India Row
Maldives India Row
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 5:51 PM IST

नवी दिल्ली Maldives India Row : मालदीवच्या मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडियावर पोस्टवर केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून आता राजकारण चांगलंच तापलंय. रविवारी भारतानं हा मुद्दा मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारकडे उपस्थित केला. माले येथील भारतीय उच्चायुक्तांनी या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. यानंतर मालदीव सरकारनं एक निवेदन जारी केलं. "हे मंत्र्यांचं वैयक्तिक मत आहे. या टिप्पण्या मालदीव सरकारच्या विचारांचं प्रतिनिधित्व करत नाहीत", असं या निवेदनात म्हटलंय.

  • What appalling language by Maldives Government official @shiuna_m towards the leader of a key ally, that is instrumental for Maldives’ security and prosperity. @MMuizzu gov must distance itself from these comments and give clear assurance to India they do not reflect gov policy.

    — Mohamed Nasheed (@MohamedNasheed) January 7, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे प्रकरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या त्यांच्या भेटीची छायाचित्रं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली होती. मोदींनी भारतीयांना या बेटाला भेट देण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर मालदीवच्या मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. मात्र भारतीय युजर्सच्या टीकेचा सामना करावा लागल्यानंतर शिउना यांनी ही पोस्ट हटवली. शिउना व्यतिरिक्त, मंत्री झाहिद रमीझ यांनी देखील सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप भेटीच्या छायाचित्रांची खिल्ली उडवली होती.

मालदीव सरकारचं निवेदन : या प्रकरणासंदर्भात आता मालदीव सरकारनं निवेदन जारी केलंय. "मालदीव सरकारला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परदेशी नेते आणि उच्चपदस्थ व्यक्तींविरोधात अपमानास्पद टिप्पण्यांची जाणीव आहे. ही मतं वैयक्तिक आहेत आणि मालदीव सरकारच्या मतांचं प्रतिनिधित्व करत नाहीत. अशा अवमानकारक टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सरकार मागेपुढे पाहणार नाही, असं या निवेदनात म्हटलंय.

मालदीव नॅशनल पार्टीनंही केली टीका : मालदीव नॅशनल पार्टीनंही आपल्या सरकारच्या मंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. मालदीव नॅशनल पार्टीनं एका पोस्टमध्ये म्हटलं, "मालदीव नॅशनल पार्टी एका सरकारी अधिकाऱ्यानं परदेशी राष्ट्रप्रमुखाविरुद्ध केलेल्या वर्णद्वेषी आणि अपमानास्पद टिप्पणीचा निषेध करते. हे अस्वीकार्य आहे. यात सहभागी असलेल्यांवर आवश्यक कारवाई करावी, अशी आमची सरकारला विनंती आहे".

हे वाचलंत का :

  1. सोशल मीडियावर #Boycott Maldives ट्रेंड का होतंय? मोदींच्या लक्षद्वीप पोस्टचा काय संबंध?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.