ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरमध्ये आढळली आयईडी बसवलेली दुचाकी; मोठा घातपात टळला - काश्मीर दुचाकी आयईडी

शनिवारी गोहलाड रीलन-मेंढार रोडवर पोलिसांची गस्त सुरू होती. यावेळी रात्री दहाच्या सुमारास ही दुचाकी पोलिसांना दिसून आली. तपासणी केली असता, यावर विस्फोटके लावलेली आढळली. यानंतर या स्फोटकांना रविवारी दुपारी एकच्या सुमारास नियंत्रित वातावरणात नष्ट करण्यात आले. पूंछचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक रमेश अंगराल यांनी याबाबत माहिती दिली.

Major tragedy averted as IED-fitted motorcycle detected in J-K's Poonch
जम्मू-काश्मीरमध्ये आढळली आयईडी बसवलेली दुचाकी; मोठा घातपात टळला
author img

By

Published : Jan 10, 2021, 5:48 PM IST

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये एक आयईडी स्फोटके लावलेली दुचाकी आढळून आली. जिल्ह्याच्या मेंढार भागामध्ये ही दुचाकी मिळाली. यावर तब्बल २.४ किलो आयईडी बसवण्यात आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मोठा अनर्थ टळला..

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी गोहलाड रीलन-मेंढार रोडवर पोलिसांची गस्त सुरू होती. यावेळी रात्री दहाच्या सुमारास ही दुचाकी पोलिसांना दिसून आली. तपासणी केली असता, यावर विस्फोटके लावलेली आढळली. यानंतर या स्फोटकांना रविवारी दुपारी एकच्या सुमारास नियंत्रित वातावरणात नष्ट करण्यात आले. पूंछचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक रमेश अंगराल यांनी याबाबत माहिती दिली.

दहशतवादी जंगलात पसार..

प्राथमित तपासानुसार, एका दहशतवाद्याने ही मोटारसायकल याठिकाणी ठेवली, आणि त्यानंतर तो आजूबाजूला असलेल्या जंगलात पसार झाला असावा असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत. यानंतर, राष्ट्रीय रायफल आणि पोलिसांचे पथक संयुक्तपणे या भागात शोधमोहीम राबवत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याचेही अंगराल यांनी सांगितले.

हेही वाचा : नवीन कोरोना स्ट्रेनचा भारतात आतापर्यंत 90 जणांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.