ETV Bharat / bharat

संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले? - SHRIRANG BARANE

lOKSABHA
लोकसभा अधिवेशन
author img

By

Published : Feb 11, 2021, 1:03 PM IST

Updated : Feb 11, 2021, 5:22 PM IST

12:44 February 11

सुप्रिया सुळेंचे मोदींना प्रत्युत्तर; पंतप्रधान म्हणाले होते शरद पवारांनी घेतला 'यू-टर्न'

सुप्रिया सुळेंचे मोदींना प्रत्युत्तर;

पवारांच्या पत्रातील मुद्दा मोदींनी वगळला..

सुप्रिया सुळे म्हणाल्या, की पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचा उल्लेख केल्यामुळे मी याबाबत काही बोलू इच्छिते. ते बोलत असतानाच मी त्यांना थांबवू शकले असते, मात्र मी ज्या संस्कृतीत वाढले त्यात असे करत नाहीत. राष्ट्रवादी अशा प्रकारचे वर्तन कधीच करत नाही. विरोध करणे चुकीचे नाही, मात्र आम्ही तसे करत नाही. पवारांच्या पत्राचा जो भाग मोदींनी वाचला, तो मी पुन्हा वाचणार नाही. मात्र, जो भाग त्यांनी वाचला नाही, तो मी इथे मांडू इच्छिते. पवार कृषी मंत्री असताना त्यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले होते.

यानंतर त्यांनी सभागृहाला सांगितले, की या पत्रामधून शरद पवारांनी कृषी कायद्यातील बदलांबाबत राज्यांना केवळ प्रस्ताव दिला होता. त्याचा पूर्ण अभ्यास करुन, राज्यांनी त्यावर 'विचार' करावा असे त्यांनी म्हटले होते.

केंद्राच्या 'यू-टर्न'चा पाढा..

पंतप्रधानांनी पवारांच्या पवित्र्याला 'यू-टर्न' म्हटल्यानंतर सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारच्या 'यू-टर्न'चा पाढाच लोकसभेत वाचला. 'जीएसटी' लागू करण्याबाबत केंद्रातील काँग्रेस सरकार जेव्हा विचार करत होते, तेव्हा गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मात्र याला विरोध केला होता. आमच्याच सरकारने नरेगा, आधार, शिक्षणाचा अधिकार असे विविध कायदे आणले. आमच्या सरकारने कधीही सुधारणांचा विरोध केला नाही. मी अशा राज्यातून येते ज्याला 'पुरोगामी' म्हणून ओळखले जाते. आम्ही जेवढ्या म्हणून सुधारणा, किंवा नवे कायदे लागू केले, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सर्वांचे मत विचारात घेऊनच ते लागू केले होते. त्यामुळे आमचा विरोध सुधारणांना नाही, तर त्या कशा प्रकारे लागू केल्या जातात याला आहे.

भाजप सरकारने काँग्रेसच्या काळात आधार, मनरेगा अशा योजनांना कडाडून विरोध केला होता. मात्र आता याच योजनांना ते डोक्यावर घेत आहेत. जर हा 'यू-टर्न' नाही, तर काय आहे?

12:44 February 11

महाराष्ट्राचा २५ हजार कोटी रुपयांचा जीएसटी परतावा तत्काळ द्यावा - खासदार बारणे

जीएसटी परतावा तत्काळ द्यावा - खासदार बारणे

महाराष्ट्र सर्वात जास्त टॅक्स केंद्र सरकारला देतो. मात्र, आजही केंद्राकडून महाराष्ट्राला २५ हजार कोटी रुपये देणे आहे. ती थकबाकी लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारला देण्यात यावी, अशी मागणी मावळ मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. खासदार निधी देण्याबाबतही बारणे यांनी लक्ष वेधले. तसेच चिट फंड, बँकेच्या घोटाळ्यामुळे काही बँकेच्या व्यवहारावर ईडीक़डून निर्बंध आणल्याने अनेकांचे पैसे अडकले आहेत, त्या संदर्भात वित्त विभागाने तातडीने निर्णय घेऊन नागरिकांची गैरसोय दुर करण्याची मागणी बारणे यांनी केली.  

12:38 February 11

अमरावती जिल्ह्यातील २४ गावात वीज पोहोचलीच नाही; विशेष आदेश काढण्याची खासदार राणांची मागणी

खासदार नवनीत राणा

७० वर्षानंतर अमरावती जिल्ह्यात २४ गावांमध्ये अद्याप वीज पोहोचली नाही. धारणी आणि चिखलधरा या तालुक्यातील गावात वीज पुरवठा करण्याचे विशेष आदेश द्यावेत अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली. ते आदिवासी आजही अंधारात राहात आहेत. १५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या अमरावती शहरात महिलांच्या सुविधासाठी गॅस पाईपलाईनची व्यवस्था सुरू करण्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी खासदार राणा यांनी केली. 

धारणी आणि अचलपूरमध्ये एकलव्य शिक्षण संस्था आणि एक सैनिक स्कुल अमरावती जिल्ह्यासाठी द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. याचबरोबर रेल्वेलाईन ब्रॉडगेज करण्यासह शकुंतला लाईन सुरू कऱण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.  

आदिवासी क्षेत्र असलेल्या अमरावती विभागात दोन सार्वजनिक रुग्णालये, २ सार्वजनिक आपत्कालीन ऑपरेशन सेटंर आणि एक मोबाईल रुग्णालयाची मागणी खासदार राणा यांनी संभागृहात केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राची खराब आरोग्य सुविधा पाहता अमरावती जिल्ह्याकरीता बायो सेफ्टी लेव्हल थ्रीच्या लॅबची मागणी करत महाराष्ट्राच्या आरोग्य विभागावर टीका केली आहे.

याशिवाय खासदार राणा यांनी अल्पसंख्याख महिलांसाठी विशेष रुग्णालय सुरू करण्यासाठी या अर्थसंकल्पातील आरोग्यावर तरतूद करण्यात आलेल्या निधीतून मंजूर करण्याची मागणी केली आहे. 

धारणी मेळघाट या आदिवासी क्षेत्रामध्ये पाण्याचा तुटव़डा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजनांसाठी निधी द्यावा, टेक्साटाईल पार्कची देखील मागणी केली.  

12:34 February 11

खासदार बापटांकडून अर्थसंकल्पाचे कौतुक; पुणे मेट्रो आणि जलप्रकल्पासाठी निधीची मागणी

खासदार बापटांकडून अर्थसंकल्पाचे कौतुक

गोर गरिबासाठी  आणि रांगेमंध्ये उभे असलेल्या माणसांपर्यंत विकासाची गंगा पोहोचवणारा हा अर्थसंकल्प असल्याचे कौतुक पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांनी केले आहे. यावेळी त्यांनी पुणे शहर पाणी पुरवठा योजना आणि संशोधन केंद्रासाठी निधीची मागणी केली. तसेच, पुणे मेट्रोसाठी आधिकचा निधी देण्याची ही विनंती केली आहे. पुणे नाशिक रेल्वे आणि महामार्गाच्या नितीन गडकरींचे बापट यांनी आभार मानले.

6 हजार ३१० कोटी कोरोना काळात केंद्राने राज्याला मदत केली.  कोरोनाकाळात  देश संकटात असताना त्याला आत्मिनिर्भरच्या माध्यमातून बाहेर काढण्याचे काम मोदी सरकारने केली. पैसे दिले तर निवडणुका डोळ्या पुढे ठेऊन दिले आणि नाही दिले तर पक्ष पाहून न दिल्याची टीका विरोधक करत असल्याचे सांगतान विरोधकांकडून विकास कामाला खीळ बसवण्याचे काम केले जात असल्याची टीका बापट यांनी केली.

Last Updated : Feb 11, 2021, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.