गांधीनगर - महाराष्ट्र समाज भवनाचे उद्घाटन भाजपा अध्यक्ष सीआर पाटील आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या हस्ते झाले. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले नाही. ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या मार्गदर्शक सुचनांचे उघडपणे उल्लंघन झाले.
समाज भवनाला समाज वाडी असे म्हणतात. इमारतीचे बांधकाम कल्पनेपेक्षा भव्य आहे. 6 कोटी रुपये खर्च करुन चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही भव्य इमारत बांधली गेली आहे. गांधीनगरची स्थापना झाली तेव्हा सरकारने ही जागा दिली होती. येथे कल्पनेपेक्षाही सुंदर इमारत बांधली गेली आहे, असे उपस्थित लोकांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री नितीन पटेल म्हणाले.
देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विदारक परिस्थिती पाहिल्यानंतरही कोरोना नियमांचे उल्लघंन होत असून लोकांमध्ये गांभीर्य नाही. देशात सध्या 4 लाखापेंक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 4 लाख 32 हजार 778 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 38,14,67,646 जणांना लस टोचवण्यात आली आहे.