ETV Bharat / bharat

राज्यासाठी लाजिरवाणी बातमी, रेल्वेतील गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल! - नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो

Crime In Railway : गेल्या काही वर्षांत रेल्वेतील गुन्ह्यांची टक्केवारी झपाट्यानं वाढली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोनं नुकतीच याबाबतची आकडेवारी जाहीर केली. चला त्यावर एक नजर टाकूया.

Railway
Railway
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 5:34 PM IST

नवी दिल्ली Crime In Railway : रेल्वेमध्ये गुन्हेगारी सातत्यानं वाढते आहे. ही रोखण्यासाठी रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि सरकारी रेल्वे पोलीस (GRP) प्रयत्नशील आहेत. मात्र असं असूनही, जर आपण नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने जाहीर केलेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर, त्यांचे हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचं चित्र दिसून येतं.

सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात : आकडेवारीनुसार, आरपीएफ आणि जीआरपी मध्ये गुन्हेगारी प्रकरणांची संख्या वाढली आहे. जीआरपीमध्ये नोंदवलेल्या गुन्हेगारी प्रकरणांची संख्या ४.९ टक्क्यांनी वाढली असून, आरपीएफमध्ये नोंदवलेल्या गुन्हेगारी प्रकरणांची संख्या ५२ टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये सर्वात चिंतेची बाब म्हणजे, सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात नोंदले गेले आहेत! त्यानंतर उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो.

जीआरपीची आकडेवारी : आकडेवारीनुसार, २०२० मध्ये जीआरपीमध्ये २९,७४६ प्रकरणं नोंदवण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रात ११,५०८, उत्तर प्रदेशात २,४९९ आणि दिल्लीत २,१७७ गुन्हे दाखल आहेत. २०२१ मध्ये जीआरपी मध्ये एकूण ४१,८१६ प्रकरणं नोंदवण्यात आली. त्यापैकी महाराष्ट्रात १०,२८०, बिहारमध्ये ३,५८५ आणि उत्तर प्रदेशात ४,१३१ गुन्हेगारी प्रकरणं नोंदवली गेली. यानंतर, २०२२ मध्ये जीआरपीनं एकूण ६७,१०४ गुन्हे नोंदवले. यामध्ये महाराष्ट्रात १९,८६०, बिहारमध्ये ६,६३० आणि उत्तर प्रदेशात ६,२८६ गुन्हे दाखल झाले आहेत.

रेल्वे संरक्षण दलाची आकडेवारी : याशिवाय रेल्वे संरक्षण दलानं (RPF) २०२० मध्ये देशभरात २,५४,६३६ प्रकरणे नोंदवली होती. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ६८,२१५ गुन्हे दाखल झाले आहेत. तर उत्तर प्रदेशात २८,७५३ आणि मध्य प्रदेशात १९,०९९ प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. तर २०२१ मध्ये ४,२४,०२७ प्रकरणं नोंदवली गेली. त्यापैकी महाराष्ट्रात ९६,६४८, गुजरातमध्ये ४९,५८७ आणि उत्तर प्रदेशात ४,३५१ प्रकरणं नोंदवली गेली. यानंतर, २०२३ मध्ये, RPF नं एकूण ७,१७,३२८ प्रकरणं नोंदवली. त्यापैकी महाराष्ट्रात १,४६,६२१ गुजरातमध्ये ८०,३४६ आणि उत्तर प्रदेशात ५५,१५२ प्रकरणं नोंदवली गेली.

हेही वाचा :

  1. पुणे देशातील दुसरं सर्वात सुरक्षित शहर! पहिला क्रमांक पूर्वेकडील 'या' शहरानं पटकावला
  2. सुनील गावसकर पोहोचले 'सचीन' रेल्वे स्थानकावर! फोटो व्हायरल; जाणून घ्या कुठे आहे हे स्टेशन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.