बेळगाव (कर्नाटक): MES Maha Melava: कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादाच्या Maharashtra Karnatak Border Row पार्श्वभूमीवर एडीजीपी आलोक कुमार यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कन्नड समर्थक नेत्यांची बैठक ADGP Alok Kumar घेतली. आलोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली बेळगावातील टिळकवाडी पोलीस ठाण्यात शांतता बैठक ADGP Meeting MES and Pro Kannada Organizations झाली.
कर्नाटक रक्षा वेदिकेच्या नारायणगौडा गटाचे राज्य समन्वयक महादेव तलवार, जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी, शिवरामेगौडा गटाचे जिल्हाध्यक्ष वाजीद हिरेकूडी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार मनोहर किणेकर, एमईएस नेते प्रकाश मरगळे, विकास कलघटगी यांच्यासह अनेकजण या बैठकीत सहभागी झाले होते.
या बैठकीत त्यांनी बेळगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याची विनंती केली. याशिवाय हुबळी आणि धारवाडपेक्षा बेळगावचा विकास झपाट्याने व्हायला हवा होता. पण तुमच्या भांडणामुळे बेळगावचा विकास खुंटत चालला आहे. कृपया राज्योत्सवाचा दिवस काळा दिवस म्हणून करू नका, असे ते म्हणाले. आलोक कुमार यांनी एमईएस नेत्यांना बेळगाव अधिवेशनादरम्यान महामेळावा न घेण्याचा आणि सीमा वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत शांतता राखण्याचा सल्ला दिला.