ETV Bharat / bharat

महादेव अ‍ॅप प्रकरण ; ईडीनं महादेव अ‍ॅप प्रकरणात दाखल केलं नवीन आरोपपत्र, 'या' तारखेला होणार सुनावणी - विशेष पीएमएलए न्यायालय

ED Files New Chargesheet : ईडीनं महादेव अ‍ॅप प्रकरणात नवीन आरोपपत्र दाखल केली असून, त्यावरील पुढील सुनावणी १० जानेवारीला होत आहे. रायपूर विशेष न्यायालयात हे नवीन आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

mahadev betting app
महादेव अॅप
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2024, 10:13 AM IST

रायपूर\दिल्ली: ED Files New Charge sheet : महादेव अ‍ॅप प्रकरणात, ईडीने अ‍ॅप ऑपरेटर आरोपी रवी उप्पल आणि सौरभ चंद्राकर यांच्यावरील कारवाई तीव्र केलीय. इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे रवी उप्पलला दुबईत अटक करण्यात आली. सौरभ चंद्राकरला दुबईतील कोणत्याही कामावर बंदी घालण्यात आली आहे. रायपूरच्या विशेष न्यायालयात नवीन आरोपपत्र दाखल करुन दोन्ही आरोपींच्या प्रत्यार्पणाबाबत ही माहिती दुबईला शेअर केली जाणार आहे.

10 जानेवारीला पुढील सुनावणी : यापूर्वी 21 ऑक्टोबर रोजी ईडीनं पहिलं आरोपपत्र दाखल केले होतं. ज्यामध्ये 14 जणांची नावं होती. सुमारे 1800 पानांचं दुसरं आरोपपत्र यावर्षी १ जानेवारी रोजी विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आलं. सौरभ चंद्राकर, रवी उप्पल, असीम दास, पोलीस हवालदार भीम सिंह यादव, शुभम सोनी अ‍ॅपशी संबंधित आणखी एक आरोपी यांची नावं या आरोपपत्रात आहेत. न्यायालयानं अद्याप तक्रारदाराच्या तक्रारीची दखल घेतलेली नाही. ईडीचे वकील सौरभ पांडे म्हणाले की, "विशेष मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा (पीएमएलए) न्यायालयानं 10 जानेवारी रोजी आरोपपत्राची दखल घेणं अपेक्षित आहे. पुढील सुनावणी 10 जानेवारीला होणार आहे."

कॉन्स्टेबल भीम सिंह यांच्या पत्नीच्या नावानं समन्स : 28 डिसेंबर रोजी भिलाई येथील ईडीचं पथक भिलाई महादेव अ‍ॅप घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या कॉन्स्टेबल भीम सिंह यादवच्या घरी पोहोचले. भीम सिंह यादव यांच्या पत्नी सीमा यादव यांच्या नावानं समन्स घेऊन ईडी अधिकारी पोहोचले. मात्र, घराला कुलूप आढळून आलं. ईडी अधिकारी अनेक तास तिथंच थांबले. त्यानंतर घरासमोर समन्स चिकटवून ईडीचं पथक परत आलं. सीमा यादव यांच्या खात्यातील अनेक मोठ्या व्यवहारांची माहिती ईडीला मिळाली होती, त्यानंतर सीमा यादव यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं.

काय आहे महादेव अ‍ॅप प्रकरण : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या 2023 च्या पहिल्या टप्प्याच्या 7 नोव्हेंबरला ईडीनं रायपूरमध्ये मोठी कारवाई केली. ईडीनं असीम दास आणि कॉन्स्टेबल भीम सिंह यादव यांना अटक केली. असीम दासकडून ५०८ कोटी रुपये जप्त करण्यात आले. कथित कॅश कुरिअरनं चौकशीदरम्यान सांगितलं की, त्याला भूपेश बघेलला ५०८ कोटी रुपये देण्यास सांगण्यात आलं. हा पैसा निवडणुकीत वापरण्यास सांगितलं असल्याचंही तो म्हणाला. दरम्यान, शुभम सोनी यानं महादेव अ‍ॅपचा मालक असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध करत ईडीला प्रतिज्ञापत्र पाठवलं. राजकारणी आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींनी अ‍ॅप चालवायला देण्यासाठी ५०८ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा दावा सोनीनं केला आहे. छत्तीसगडचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी हे आरोप फेटाळून लावत हा तपासाचा विषय असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, असीम दासनं रायपूर येथील विशेष न्यायालयात सांगितलं की, "त्याला एका कटात अडकवण्यात आलं आहे आणि आपण कधीही राजकारण्यांना रोख रक्कम दिली नाही." असंही तो म्हणाला. दरम्यान, या प्रकरणामुळे काँग्रेसला छत्तीसगडमध्ये फटका बसल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.

हेही वाचा :

1 लाचखोरीच्या आरोपाखाली 'पेसो'च्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांना सीबीआयच्या पथकाकडून अटक

2 हिटलरच्या प्रचार यंत्रणेप्रमाणे भाजपाचं काम, शरद पवारांचा मोंदीवर हल्लाबोल

3 जितेंद्र आव्हाड यांना वादग्रस्त वक्तव्य करणं पडलं महागात; साधू महंतांकडून तक्रार दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.