नवी दिल्ली/मुंबई Sanjay Raut on INDIA bloc meeting : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलीय. महाविकास आघाडीच्याही जागावाटपावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस नेते मुकूल वासनिक यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. महाविकास आघाडीच्या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय. तसंच या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत धुसफूस असल्याची चर्चाही त्यांनी फेटाळून लावलीय. या बैठकीत वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशावरही चर्चा झाल्याचं राऊतांनी म्हटलंय.
काय म्हणाले संजय राऊत : महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "संघर्षाच्या काळात आम्ही एकत्र आहोत. एकत्र निवडणूक लढवू आणि महाराष्ट्रातून 'इंडिया' आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणणार आहोत. आमच्यात जागावाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत. सगळ्या जागांवर 'वन टू वन' चर्चा झाली होऊन आमची जवळपास सहमती झालीय. कोण किती जागा लढवणार तो आकडा नंतर येईल. वंचित बहुजन आघाडीबाबतही आमच्यात विस्तृत चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांना आम्ही इंडिया आघाडीमध्ये सामील करण्याची मान्यता सगळ्यांनी दिलीय." संजय राऊतांनी सांगितल्यानुसार महाविकास आघाडीत लवकरच 'वंचित'चा समावेश होण्याची चिन्हं असल्याचं स्पष्ट झालंय.
तुम्ही पाहिलं असेल की बैठकीनंतर बाहेर पडताना आम्ही हसत हसत बाहेर आलो आहोत. एक साथ रहेंगे एक साथ चुनाव लढेंगे. जागांबाबत सर्वांचे एक मत झाले आहे-खासदार संजय राऊत
बैठकीला अनेक जण उपस्थित : काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जागावाटपाची चर्चेसाठी झालेल्या या बैठकीला राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) आमदार नेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, विनायक राऊत आदी उपस्थित होते.
कसा असू शकतो जागावाटप फॉर्मुला : दिल्लीतील मंगळवारच्या बैठकीत दोन ते तीन जागा वगळता तिन्ही पक्षांचं एक मत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात जास्त जागा दिल्या जाणारा असून काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला समसमान जागा दिल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाला 15 तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला 14-14 तसेच वंचितला 2 जागा दिल्या जाणार आहे. तसंच इतर 3 जागा मित्र पक्षांना दिल्या जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जो जिंकेल त्याला जागा - जितेंद्र आव्हाड- आजच्या बैठकीमध्ये चर्चा अपेक्षापेक्षा जास्त यशस्वी झाली असल्याचं शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. शिवसेनेची जास्त जागांची मागणी ही गोष्ट खरी आहे. त्यांचे बळदेखील जास्त आहे. शिवसेनेची मागणी खरी असली तरी उद्धव ठाकरेंशी आमचं चांगलं बोलणं झालंय. जागा वाढवायच्या म्हणून वाढवायच्या नाहीत. तर जो जिंकू शकेल त्याला ती जागा द्यायला पाहिजे असंही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
असा असू शकतो जागावाटप फॉर्म्यूला- दिल्लीतील आजच्या बैठकीत दोन ते तीन जागा वगळता तिन्ही पक्षांचे एक मत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे शिवसेनेला सर्वात जास्त जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला समसमान जागा दिल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाला 15 काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला 14 - 14 तसेच वंचितला 2 जागा दिल्या जाणार आहेत. तसेच इतर 3 जागा मित्र पक्षांना दिल्या जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :