ETV Bharat / bharat

महाशिवरात्र 2021 : महादेवाला कसे प्रसन्न करावं; जाणून घ्या राशीनुसार उपासना करण्याची पद्धत - राशीनुसार महादेवाची उपासना करण्याची पद्धत

फाल्गुन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदाचे महाशिवरात्रीचे पर्व विशेष असल्याचे म्हटलं जात आहे. यंदाच्या महाशिवरात्रीला शिवयोग, सिद्धियोग आणि धनिष्ठा नक्षत्र योग, असे अद्भूत शुभ योग आहेत.

महाशिवरात्र 2021
महाशिवरात्र 2021
author img

By

Published : Mar 11, 2021, 11:50 AM IST

रायपूर - महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि देवी पार्वती यांची विधिवत पूजा केली जाते. महाशिवरात्रीला महादेवाच्या दर्शनासाठी 'हरहर महादेव'च्या गजरात भाविकांची गर्दी होते. महाशिवरात्री हा भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह दिवस मानला जातो.

महादेवाला कसे प्रसन्न करावं...

फाल्गुन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदाचे महाशिवरात्रीचे पर्व विशेष असल्याचे म्हटलं जात आहे. यंदाच्या महाशिवरात्रीला शिवयोग, सिद्धियोग आणि धनिष्ठा नक्षत्र योग, असे अद्भूत शुभ योग आहेत.

महाशिवरात्री मुहूर्त आणि पूजा विधी -

  • निशिथ काळात पुजा करण्याचा 'शुभ योग'
  • 10 मार्चच्या रात्री 11:49 ते 11 मार्च 12:37 पर्यंत विशेष योग
  • बेलाची पाने, रुईचे फुले , चमेली, कमळाचे फूल महादेवाला प्रिय आहे
  • ओम नमः शिवाय' आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा
  • जल, दूध, गंगाजल आणि पंचामृताने महादेवाचा अभिषेक करावा
  • कुमारी मुलींसाठी हे व्रत फलदायी असते. कुमारी मुलींनी महादेवाचा जल, दूध, गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक करावा.

राशीनुसार महादेवाची पूजा कशी करावी?

  • मेष - महाशिवरात्रीच्या दिवशी मेष राशी असलेल्यांना धनलाभ होण्यीच चिन्हे आहेत. या दिवशी मेष राशीच्या लोकांनी गंधसरुच्या फुलांनी महादेवाचा अभिषेक करावा.
  • वृषभ - महाशिवरात्रीच्या दिवशी वृषभ राशीचा लोकांचा सिद्धी योग आहे. या राशीच्या लोकांनी महादेवाल बेलपत्र अर्पण करावे.
  • मिथुन - महाशिवरात्रीच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. या राशीच्या लोकांनी महादेवाला केशर आणि चंदनाने अभिषेक करावा.
  • कर्क राशी - महाशिवरात्रीच्या दिवशी कर्क राशीच्या लोकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावे. गंगाजलाने महादेवाच अभिषेक करावा.
  • सिंह राशी - महाशिवरात्र सिंह राशीच्या लोकांना अनुकूलता प्रदान करेल.
  • कन्या राशी - महाशिवरात्रीच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी. महादेवाचा पंचामृत व दुधाने अभिषेक करावा.
  • तूळ राशी - महाशिवरात्रीच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांना न्याय मिळेल.
  • वृश्चिक राशी - या राशीच्या लोकांना घर आणि वाहन सुखाचे योग आहेत.
  • धनु राशी - धनु राशीच्या लोकांनी श्रद्धा ठेवावी. त्यांचे कार्य होतील. कणेरची फुले अर्पित करावीत.
  • मकर राशी - मकर राशीच्या लोकांनी नातेवाईकांकडून लाभ होण्याच योग आहेत. या लोकांनी नागसेसरांची फुले महादेवाला अर्पण करावीत.
  • कुंभ राशी - कुंभ राशीच्या लोकांसाठी ही महाशिवरात्र अनुकूल आहे. या दिवशी त्यांनी महामृत्युंजय जपाचे पठण करावे.
  • मीन राशी - महाशिवरात्रीच्यादिवशी मीन राशीच्या लोकांनी सावधपणे काम करावे. महादेवाला चमेली आणि कमळाची फुले अर्पण करावी.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.