ETV Bharat / bharat

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ; खिशाला झळ - commercial cylinder

तेल मार्केटिंग कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. व्यावसायिक 19 किलोचे सिलेंडर 73.50 रुपयांनी महाग झाले आहे.

gas cylinder
गॅस सिलेंडर
author img

By

Published : Aug 1, 2021, 1:05 PM IST

नवी दिल्ली - वाढत्या महागाईमध्ये सामान्य जनतेला आणखी एक झटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीबरोबरच आता एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत देखील वाढत आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. या नव्या किंमती 1 ऑगस्टपासून लागू झाल्या आहेत. व्यावसायिक 19 किलोचे सिलेंडर 73.50 रुपयांनी महाग झाले आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. तर गेल्या 10-12 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दरही बदललेले नाहीत.

सरकारी तेल कंपन्यांनी 1 ऑगस्टपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढवले ​​आहेत. सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईलने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 73.50 रुपयांनी वाढ केली आहे. दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1,500 रुपयांवरून 1623 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. त्यामुळे गॅस दरवाढीचा परिणाम महिन्याच्या बजेटवर पडणार आहे.

महागाईचा भडका -

सर्वसामान्य कोरोनाच्या महामारीच्या संकटात विविध समस्यांना सामोरे जात असताना महागाईनेही त्रस्त झाला आहे. खाद्यतेल आणि एलपीजी सिलिंडरच्या किमतींनी गेल्या तीन वर्षातील उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.दैनंदिन जीवनात लागणारे खाद्यतेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. विविध शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत वेगवेगळी आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी इत्यादी ठिकाणी करण्यात येतो.

हेही वाचा - #Cylinder man : गॅसवाला कसा बनला "सिलिंडर मॅन"? जाणून घ्या...

हेही वाचा - दिल्लीमध्ये सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील सहा ठार

हेही वाचा - राज्य सरकार कडून इंधन दर वाढीवर दिलासा नाहीच!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.