भोपाळ - मध्य प्रदेश राज्यातील बैतूलमध्ये लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. नाव बदलून एका मुस्लिम व्यक्तीने विवाहित महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. चहामध्ये बेशुद्धीचे औषध टाकून तिच्यावर बलात्कार केला. त्याचा व्हिडिओही बनवला. यानंतर, तरुणाने महिलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, पतीपासून वेगळे होण्याचा आणि धर्मांतर करण्याचा दबाव टाकला. अखेर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायदा आणि बलात्काराच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
चहामध्ये औषधे मिसळून बेशुद्ध केले -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवाहित महिलेची प्रवासादरम्यान बस चालक राजू उर्फ फिरोज खानशी ओळख झाली. फेब्रवारी महिन्यात महिला बैतुलला आल्यानंतर आरोपीने तिला चहा पाजला. चहामध्ये त्याने गुंगीचे औषध टाकले होते. चहा पिल्यानंतर ती बेशुद्ध झाली. जेव्हा तीला जाग आली. तेव्हा ती सोनाघाटीमधील एका घरात होती. जिथे आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी -
या प्रकाराबद्दल कोणाकडे वाच्यता केली, तर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून देईल, अशी धमकी त्याने महिलेला दिली. यानंतर त्याने ब्लॅकमेल करून महिलेवर अनेकदा बलात्कार केला. तसेच धर्मपरिवर्तन करण्याचा दबाव टाकला. एवढेच नाही, तर आरोपीने महिलेच्या पतीलाही पत्नीला सोडून देण्याची धमकी दिली होती. अखेर महिलेने आरोपीसोबतचे संपर्क संपवत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.
लव्ह जिहाद विरोधात कायदा -
मध्य प्रदेशात लव्ह जिहादविरूद्ध कायदा लागू केला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात 'धार्मिक स्वातंत्र्य विधेयक 2020' मंजूर करण्यात आले. आरोपीविरोधात अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा नोंदविला जाईल आणि किमान दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद असेल. एक लाख रुपये दंडही ठोठावला जाणार आहे. लव्ह जिहादला पाठिंबा देणाऱ्यांनाही मुख्य आरोपी केले जाईल. त्यांना मुख्य आरोपीप्रमाणेच शिक्षा होईल. बळजबरी, फसवणूक किंवा धर्मांतरासाठी आमीष दाखवून केलेले विवाह रद्द करण्याचीही तरतूद कायद्यामध्ये आहे. उत्तर प्रदेशमध्येही योगी सरकारने एका अध्यादेशाद्वारे 24 नोव्हेंबर 2020 रोजी लव्ह जिहादविरूद्ध कायदा लागू केला आहे.
हेही वाचा : लव्ह-जिहाद सारख्या घटनांना महाराष्ट्राने आजवर थारा दिला नाही - उर्मिला मातोंडकर
हेही वाचा : जेएनयू विद्यार्थ्यांकडून 'लव्ह जिहाद'विरोधात 'लव्ह आझाद' अभियान
हेही वाचा : लव्ह जिहाद आणि राज्यातील अनेक मुद्यांवर उपमुख्यमंत्र्यांची खास मुलाखत
हेही वाचा : यूपीच्या बरेलीमध्ये आणखी एक लव्ह जिहाद? हिंदू मुलासोबत मुस्लीम मुलीचे लग्न
हेही वाचा : कंगनाकडून लव्ह जिहाद कायद्याचे समर्थन