ETV Bharat / bharat

लोणी प्रकरण : ट्विटरच्या एमडीला २४ जूनला हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश

author img

By

Published : Jun 21, 2021, 10:40 PM IST

द्वेष पसरविल्या जाणाऱ्या ट्विटमुळे समाजात तणावाची स्थिती निर्माण झाल्याचेही पोलिसांनी ट्विटर इंडियाच्या एमडीला पाठविलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. तसेच देशातील दोन गटांमध्ये शत्रुत्वाची भावना आणि सामाजिक एकतेला धोका निर्माण झाल्याचेही नोटीसमध्ये नमदू करण्यात आले आहे.

ट्विटर इंडिया
ट्विटर इंडिया

लखनौ (उत्तर प्रदेश) - गाझियाबाद पोलिसांनी ट्विटरचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांना २४ जून रोजी लोणी सीमेच्या पोलीस स्थानकात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वृद्धाला मारहाण झालेल्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात लोणी पोलिसांना चौकशी करायची आहे.

ट्विटरने व्हायरल व्हिडिओला दिलेल्या उत्तराबाबत गाझियाबाद पोलीस असमाधानी आहेत. त्यांनी ट्विटरचे एमडी मनीष माहेश्वरी यांना दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले, की तुमचा १८ जूनचा ई-मेल मिळाला आहे. त्यावरून तुम्ही तपास प्रक्रिया टाळत असल्याचे स्पष्ट होत आहे. तुम्ही दिलेले स्पष्टीकरण हे कोणत्याही पद्धतीने ग्राह्य धरले जाऊ शकत नाही.

हेही वाचा-पत्नीच्या छळाला कंटाळून वनरक्षक पतीची आत्महत्या; लग्ना आधीच्याही खर्चाचा मागायची हिशोब

पोलिसांनी नोटीसमध्ये काय म्हटले?

ट्विटर इंडियाचे एमडी म्हणून तुम्ही कंपनीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळे भारतीय कायदा तुम्हाला बंधनकारक असल्याने तपासात सहकार्य करण्याची गरज आहे. तुम्हाला भारतातील स्थितीप्रमाणे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ट्विट हे काढून टाकण्याचे अधिकार आहेत. द्वेष पसरविल्या जाणाऱ्या ट्विटमुळे समाजात तणावाची स्थिती निर्माण झाल्याचेही पोलिसांनी नोटीसमध्ये म्हटले आहे. तसेच देशातील दोन गटांमध्ये शत्रुत्वाची भावना आणि सामाजिक एकतेला धोका निर्माण झाल्याचेही नोटीसमध्ये नमदू करण्यात आले आहे.

हेही वाचा-MAHARSHTRA BREAKING LIVE : उद्योजक अविनाश भोसले यांची ४० कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

उत्तर प्रदेश पोलिसांनी १६ जूनला लोणी प्रकरणात ट्विटर इंडियासह नऊ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

काय प्रकरण?

गाझीयाबादमधील व्हायरल व्हिडिओत काही तरुण वृद्ध मुस्लिम व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. 'जय श्रीराम' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा देण्याची बळजबरी हल्लेखोरांनी आपल्यावर केली. मोबाइल काढून घेतला आणि चाकूने आपली दाढी कापली, असे पीडित व्यक्ति अब्दुल समद सैफी यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ति अब्दुल समद सैफी हे बुलंदशहरातील रहिवासी आहेत. गेल्या ५ जूनला ते लोनी बॉर्डरच्या बेहटा येथे पोहचले. अब्दुल समद तेथून एका अन्य व्यक्तिसोबत आरोपी प्रवेश गुज्जरच्या घर बंथला गेले होते. पीडित अब्दुल समद ताबीज बनवण्याचे काम करतात. ताबिजचा प्रभाव उलटा झाल्यानंतर आरोपींनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. तर पीडित व्यक्तीने आपल्या धर्मामुळेच लक्ष्य केल्याचा आरोप केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.