ETV Bharat / bharat

कर्नाटकात लोकायुक्त अधिकाऱ्यांचे 35 ठिकाणी छापे, 'इतक्या' कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 10:06 AM IST

Lokayukta Raid in Bengluru : कर्नाटकातील बंगळुरु आणि रामनगर जिल्ह्यात लोकायुक्तांनी सहा सरकारी अधिकाऱ्यांशी संबंधित 35 ठिकाणी छापेमारी केलीय. यात 51.13 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

Lokayukta Raid in Bengluru
Lokayukta Raid in Bengluru

बंगळुरु Lokayukta Raid in Bengluru : कर्नाटक लोकायुक्तांनी मंगळवारी बंगळुरू आणि रामनगर जिल्ह्यांतील सहा सरकारी अधिकार्‍यांवर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी छापे टाकले. या छाप्यादरम्यान या अधिकाऱ्यांनी तब्बल 51.13 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचं उघड झालंय. लोकायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत सदस्य एच. एस. सुरेश यांच्याकडे 25.58 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आहे. या छापेमारीमुळं कर्नाटकातील अधिकारी वर्गात एकच खळबळ उडालीय.

कोणत्या अधिकाऱ्यांवर लोकायुक्त अधिकाऱ्यांची छापेमारी : लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सकाळी सहा अधिकाऱ्यांच्या 35 ठिकाणी छापे टाकले. बेसकॉमच्या मुख्य कार्यालयावर मुख्य महाव्यवस्थापक (ओपी) एमएल नागराज, देवनहल्ली तालुका पंचायत विकास अधिकारी डीएम पद्मनाभ, पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता एन सतीश बाबू, केआरआयडीएलचे एईई सय्यद मुनीर अहमद, ग्रामपंचायत सदस्य एच एस सुरेश, नियोजन प्राधिकरणाचे सदस्य सचिव आणि नगर नियोजन विभागाचे सहसंचालक मंजेश अनिकल यांच्याशी संबंधित मालमत्तावर छापो टाकल्याची माहिती लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दिलीय. लोकायुक्त अधिकार्‍यांनी ज्या अधिकार्‍यांच्या जागेवर छापा टाकला त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे.

छापेमारीत अनेक बेहिशोबी मालमत्ता जप्त : ग्रामपंचायत सदस्य सुरेशच्या मालमत्तेत 16 भूखंड, एक घर, 7.6 एकर शेतजमीन, 11.97 लाख रुपये रोख, 2.11 कोटी रुपयांचे दागिने, 2.07 कोटी रुपयांची वाहने यांचा समावेश आहे. तर केआर सर्कल, बंगळुरु येथील बेसकॉमच्या मुख्य कार्यालयाचे मुख्य महाव्यवस्थापक एम. एल. नागराज यांच्या मालकीच्या 7 ठिकाणी छापोमारी करण्यात आली. यात अंदाजे 5.35 कोटी रुपयांचे 13 भूखंड, 2 घरे, शेतजमीन, 6.77 लाख रुपयांची वारसाहक्क, 16.44 लाख रुपयांची रोकड, 13.50 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 63.66 लाख रुपयांच्या घरगुती वस्तू जप्त करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

दुसऱ्या अधिकाऱ्याचीही मालमत्ता जप्त- बंगळुरू जिल्ह्यातील देवनहल्ली तालुक्यातील पंचायत विकास अधिकारी डीएम पद्मनाभ यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला. यात 5.35 कोटी रुपयांची दोन घरे, 8 एकर शेतजमीन आणि एक फार्महाऊस, 2.62 लाख रुपयांची मालमत्ता, 17.24 लाख रुपयांची रोकड, 28.75 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 5.98 कोटी रुपयांच्या इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

  1. कर्नाटकात लोकायुक्त अधिकार्‍यांचे 63 हून अधिक ठिकाणी छापे, कोट्यवधींची मालमत्ता जप्त
  2. 42 Crore Cash Recovered : कर्नाटकात राजकीय नेत्याच्या नातेवाईकाच्या घरी सापडली '25 खोके' रोकड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.