नवी दिल्ली - महागाईच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या खासदारांच्या घोषणाबाजीने लोकसभा तसेच राज्यसभा दणाणून सोडली. त्यामुळे संसदेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. नियमानुसार, सभागृहात फलक आणण्याची परवानगी नाही, असे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितले. घोषणाबाजी तसेच बॅनरबाजी थांबवण्याची विनंती त्यांनी विरोधी खासदारांना केली. मात्र घोषणाबाजीमुळे सभागृहात गोंधळ सुरू होता. त्यातच सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले. दुपारनंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली. मात्र पुन्हा विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
राज्यसभेचे कामकाज स्थगित - संसद परिसरातील आंदोलनाचे पडसाद संसदेतही दिसून आले. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यातच अवघ्या दोन मिनिटीत राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. दुपारी 2 वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्याची घोषणा उपराष्ट्रपती तसेच पीठासीन अधिकारी व्यंकय्या नायडू यांनी केली. लोकसभेचे कामकाजही सुरू झाले. प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला. मात्र लोकसभेतही विरोधकांची घोषणाबाजी सुरू केली. हौद्यात उतरुन विरोधी खासदार घोषणाबाजी केली. पोस्टर घेऊन विरोधकांची निदर्शने सभागृहात सुरू होती. विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न सभापती ओम बिर्ला यांनी केला. महागाईवर यापूर्वी चर्चाची संधी दिली होती, असे ते म्हणाले. मात्र खासदारांचा गोंधळ सुरू होता. त्यातच सभापतींनी दुपारी 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले. दुपारनंतर पुन्हा दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
खासदार गोहिल यांची सडकून टिका - राज्यसभेचे काँग्रेसचे खासदार शक्तीसिंह गोहिल यांनी सभगृहतून बाहेर आल्यावर विरोधकांचे मत मांडले. जीएसटीच्या नावाखाली सरकार लोकांची पिळवणूक करत असल्याचे ते म्हणाले. अनेक गरजेच्या वस्तुंवर कर लावण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. एवढेच नाही तर स्मशानात लागणाऱ्या वस्तुंच्यावरही सरकारने कर लावला आहे. ही गोष्ट अत्यंत निषेधार्ह आहे. लोकांचे जगणे तर महागाईमुळे मुश्किल झाले आहेच. आता या करांच्यामुळे लोकांचे मरणही महाग होत आहे. हे सरकार एवढे निष्ठूर असल्याचे मत गोहील यांनी व्यक्त केले.
संसदेबाहेरही निदर्शने - संसदेच्या दुसऱ्या दिवशी सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत महागाई आणि महागाईविरोधात घोषणाबाजी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसदेत महागाई आणि महागाई या मुद्द्यांवर विरोधकांच्या निदर्शनात सामील झाले. संसदेच्या आवारात गांधी पुतळ्यासमोर विरोधकांनी आज सकाळपासूनच महागाईवरुन आंदोलनास सुरुवात केली आहे. जोरदार घोषणाबाजी तसेच पोस्टरबाजीसह विरोधक मोदीसरकारवर हल्लाबोल करत आहेत (Opposition protest over inflation).
पंतप्रधानांचे आवाहन - संसदेचे पावसाळी अधिवेशन कालपासून ( Monsoon Session ) सुरू झाले आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, देशासाठी हा कालावधी खूप महत्त्वाचा आहे. हा काळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आहे. आगामी 15 ऑगस्ट आणि त्यापुढील 25 वर्षांचे विशेष महत्त्व आहे. कारण आता देश अमृत महोत्सव साजरा करीत आहे तर 25 वर्षांनी देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, तेव्हा आपला प्रवास आणि आपण ज्या नवीन उंची गाठू, ते ठरवण्याचा संकल्प करण्याची वेळ आलेली आहे.
विरोधकांचा हल्लाबोल - मोदींनी विकास आणि सकारात्मकतेचे आवाहन केले असले तरी दुसऱ्याच दिवशी विरोधकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. महागाईच्या मुद्यावरुन प्रामुख्याने विरोधक सवाल करत आहेत. काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षातील प्रमुख खासदार यावेळी उपस्थित होते.