ETV Bharat / bharat

केरळमध्ये 69.95 टक्के, तामिळनाडूमध्ये 63.47 टक्के आणि पद्दुचेरीत 77.90 टक्के मतदान

author img

By

Published : Apr 6, 2021, 6:30 AM IST

Updated : Apr 6, 2021, 6:54 PM IST

LIVE Updates of the assembly elections in Tamilnadu Kerala and Puducherry
LIVE Updates : केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुकांचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

18:48 April 06

खासदार के. कनिमोळी यांनी पीपीई किट घालून केले मतदान

कोरोनाचा संसर्ग झालेले द्रमुकचे खासदार के. कनिमोळी यांनी चेन्नईच्या मायलापूर येथील मतदान केंद्रावर पीपीई किट घालून मतदान केले. कोरोना संक्रमित रुग्णांना मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने सायंकाळी सहा ते सात यासाठी एक तासाचा वेळ दिला आहे.

18:15 April 06

साडेपाच वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी पहा

केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात आज विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडले. या तीनही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. केरळमध्ये 69.95 टक्के, तामिळनाडूमध्ये 63.47 टक्के आणि पद्दुचेरी 77.90 टक्के मतदान झाले आहे.

16:34 April 06

तामिळनाडू - अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) पक्षाच्या बाबू मुरुगावेल यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक)चे नेते उधयानिधी स्टालिन यांच्याविरोधात मतदान करताना पक्षाचा लोगो असलेला शर्ट घातल्याची तक्रार दाखल केली.

15:53 April 06

तामिळनाडूच्या त्रिची येथील मतदान केंद्रावर दृष्टिबाधित मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

त्रिची
त्रिची

15:44 April 06

केरळमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 60.03 टक्के मतदान

13:14 April 06

  • केरळ : दुपारनंतर मतदानाचा वेग मंदावला. दुपारी १ वाजेपर्यंत ४४.१ टक्के मतदानाची नोंद.
  • तामिळनाडू : दुपारी एक वाजेपर्यंत ३९.६१ टक्के मतदानाची नोंद.
  • पुद्दुचेरी : दुपारी एक वाजेपर्यंत ५३.३० टक्के मतदानाची नोंद.

12:17 April 06

दुपारी १२ वाजेपर्यंतची टक्केवारी..

दुपारी १२ वाजेपर्यंत -

  • केरळमध्ये ४०.०१ टक्के
  • तामिळनाडूमध्ये २६.२९ टक्के
  • पद्दुचेरीमध्ये ३५.७१ टक्के

मतदानाची नोंद झाली आहे.

12:11 April 06

कटप्पाने केले मतदान..

LIVE Updates of the assembly elections in Tamilnadu Kerala and Puducherry
कटप्पाने केले मतदान..

बाहुबलीमधील कटप्पा, म्हणजेच अभिनेता सत्यराज याने नुंगांबक्कम येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

11:37 April 06

सकाळी अकरा वाजेपर्यंतची टक्केवारी..

  • तामिळनाडूमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत २६.२९ टक्के मतदानाची नोंद झाली.
  • केरळमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत ३०.०१ टक्के मतदानाची नोंद झाली.
  • पुद्दुचेरीमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत ३५.५९ टक्के मतदानाची नोंद झाली.

11:06 April 06

तामिळनाडू : मुख्यमंत्र्यांनी केले मतदान.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडाप्पडी पलानीस्वामी यांनी सालेममध्ये आपला मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी त्यांनी नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले.

10:45 April 06

केरळ : सकाळी साडेदहापर्यंत २१ टक्के मतदान..

केरळमध्ये सकाळी साडेदहा वाजेपर्यंत २१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

10:44 April 06

तामिळनाडू : द्रमुक मतदारांना पैसे वाटत आहे; भाजपाचा आरोप

द्रमुकचे लोक मतदारांना पैसे वाटताना दिसून आले आहेत. आम्ही याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. कशाही प्रकारे निवडणूक जिंकण्यासाठी द्रमुक असे करत असल्याचा आरोप भाजपा उमेदवार खुशबू सुंदर यांनी केला आहे.

10:25 April 06

तामिळनाडू अपडेट..

  • काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
  • तेलंगणाचे राज्यपाल डॉ. तमिलीसाई सौंदराजन यांनी चेन्नईमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.

10:20 April 06

केरळ : सकाळी दहा वाजेपर्यंत १८.५ टक्के मतदान..

केरळमध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत १८.५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

09:47 April 06

तामिळनाडू : स्टॅलिन यांनी करुणानिधींच्या स्मृतीस्थळाला भेट दिली

द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी आपले वडील आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. यावेळी त्यांच्या पत्नी, आणि मुलगा उदयानिधीही त्यांच्यासोबत उपस्थित होते.

09:32 April 06

तामिळनाडू : उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी केले मतदान..

तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी पेरियाकुलम गावात मतदान केले. एनडीएचे सर्व उमेदवार निवडणूक जिंकतील आणि सलग तिसऱ्या वर्षी अण्णाद्रमुकचे सरकार येईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

09:31 April 06

तामिळनाडू-पुद्दुचेरीमधील सकाळी नऊपर्यंतची टक्केवारी..

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत १३.८ टक्के तर पुद्दुचेरीमध्ये १५.६३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

09:30 April 06

केरळ : साडेनऊपर्यंत १७.२ टक्के मतदानाची नोंद..

केरळमध्ये सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत १७.२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

09:24 April 06

तामिळनाडू : अभिनेता विजयने केले मतदान..

प्रसिद्ध तामिळ अभिनेता विजयने आपला मतदानाचा हक्क बजावला. त्याने आपल्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत सायकलवर जात मतदान केले.

09:11 April 06

पु्द्दुचेरी : माजी मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांनी केले मतदान..

पुद्दुचेरीचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते व्ही. नारायणसामी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

09:03 April 06

केरळ : सकाळी नऊ वाजेपर्यंत १०.२ टक्के मतदानाची नोंद..

केरळमध्ये पहिल्या दोन तासांमध्ये १०.२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

08:58 April 06

केरळ : यूडीएफच्या पोलिंग एजंटला मारहाण करण्यात आल्याचा आरोप...

केरळ काँग्रेस डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी जेम्स मरूर यांना मारहाण करण्यात आली आहे. एलडीएफच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

08:57 April 06

केरळ : विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी केले मतदान..

केरळमधील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी हरिपद येथील मतदान केंद्र क्रमांक ५१अ वर मतदान केले.

08:52 April 06

तामिळनाडू : अभिनेता शिवाकार्तिकेयनने केले मतदान..

अभिनेता शिवाकार्तिकेयनने तामिळनाडूमधील वलसरवक्कम मतदान केंद्रावर मतदान केले.

08:48 April 06

तामिळनाडूमध्ये दोन ठिकाणी मतदान उशिराने सुरू..

तामिळनाडूमधील अडमबकम येथील शेट्टी स्कूल आणि तिरुमंगलममधील पुदुपट्टी येथील मतदान उशिराने सुरू झाले. ईव्हीएम मशीनमध्ये खराबी आढळल्याने हा प्रकार घडला.

08:40 April 06

केरळ : मुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आपल्या पत्नीसह मतदान केले. एलडीएफ या निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्त करेल, आणि भाजपाचे शटर केरळमध्ये बंद होईल असे ते यावेळी म्हणाले.

08:38 April 06

केरळ : सकाळी साडेआठपर्यंत ८.१ टक्के मतदानाची नोंद..

केरळमध्ये सकाळी साडेआठपर्यंत ८.१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. एका तासामध्ये केवळ ४ टक्के मतदानाच्या टक्केवारीनंतर आता मतदानाने वेग पकडला आहे.

08:35 April 06

तामिळनाडू : अभिनेता उदयानिधी स्टॅलिनने केले मतदान..

द्रमुक अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि चेपुक मतदारसंघातील उमेदवार उदयानिधी स्टॅलिन यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले.

08:23 April 06

तामिळनाडू : पी. चिदंबरम यांनी बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शिवगंगा जिल्ह्यातील कांदानौर येथे आपले मत नोंदवले.

08:21 April 06

केरळ : पहिल्या तासात ४.३३ टक्के मतदानाची नोंद..

केरळमध्ये सकाळी आठ वाजेपर्यंत ४.३३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.

08:20 April 06

केरळ : कान्हागडमधील ईव्हीएम मशीन खराब..

कान्हागडमधील मतदान केंद्र क्रमांक १८५ आणि १८७ मधील ईव्हीएम मशीन खराब झाल्या आहेत. त्यामुळे मतदान काही काळासाठी थांबवण्यात आले आहे.

08:19 April 06

तामिळनाडू : द्रमुकचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी केले मतदान..

द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मतदान होत असल्याची माहिती मला मिळाली आहे, हे मतदान म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असलेला जनतेचा रोष आहे असे मत स्टॅलिन यांनी यावेळी व्यक्त केले.

08:18 April 06

केरळ : मुख्यमंत्री पिनराई मतदानासाठी हजर..

केरळचे मुख्यमंत्री पिनराई हे आपल्या पिनराई गावात मतदानासाठी हजर झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही मतदान करतील.

07:38 April 06

केरळ : पहिल्या अर्ध्या तासात ३ टक्के मतदानाची नोंद..

केरळमध्ये पहिल्या अर्ध्या तासात तीन टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली होती.

07:32 April 06

तामिळनाडू : अभिनेता कमल हसन, अभिनेत्री श्रुती आणि अक्षरा हसनसह मतदानास हजर..

अभिनेते कमल हसन आपल्या मुली श्रुती आणि अक्षरा हसन यांच्यासह चेन्नईमध्ये मतदानासाठी हजर झाले आहेत. अलवरपेट येथील मतदान केंद्रावर ते आपला हक्क बजावतील.

07:26 April 06

मोदींनी केले मतदानाचे आवाहन..

undefined

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटच्या माध्यमातून चार राज्ये आणि एका मतदारसंघातील नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

07:18 April 06

केरळ : ई.पी. जयराजन यांनी केले मतदान..

सीपीआय नेते ई.पी. जयराजन यांनी अळिकोड अरोली शाळेतील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.

07:15 April 06

तामिळनाडू : रजनीकांत मतदानासाठी हजर..

सुपरस्टार रजनीकांत चेन्नईमधील अयाराम विलाक्कू मतदान केंद्रावर मतदानासाठी हजर झाला आहे.

07:12 April 06

तामिळनाडू : अभिनेते सूर्या, शिवकुमार आणि कार्ती यांनी केले मतदान..

अभिनेते सूर्या, शिवकुमार आणि कार्ती यांनी चेन्नईमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.

07:09 April 06

केरळ : सकाळीपासूनच नेते मतदानासाठी हजर..

केरळमध्ये मतदान सुरू होण्याअगोदरपासूनच नेते आणि उमेदवार मतदानासाठी हजर झाले आहेत.

07:08 April 06

तामिळनाडू : अभिनेता अजितने केले मतदान..

प्रसिद्ध अभिनेता अजित कुमार आणि त्याची पत्नी शालिनी यांनी कुप्पम बीच मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.

07:02 April 06

मतदानाला सुरुवात..

तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमधील सर्व मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली आहे.

06:58 April 06

'मेट्रो-मॅन' मतदानासाठी हजर..

केरळचे मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे ई श्रीधरन हे पोन्नई येथील मतदान केंद्रावर हजर झाले आहेत. ते या निवडणुकीमध्ये भाजपाकडून उभे आहेत.

06:45 April 06

कोणत्या राज्यात किती जागांसाठी धुमशान?

  • केरळ -  140 विधानसभा मतदारसंघ.
  • तामिळनाडू - 234 विधानसभा मतदारसंघ.
  • पुदुच्चेरी (केंद्रशासित प्रदेश) - 30 विधानसभा मतदारसंघ.

06:40 April 06

तयारी पूर्ण.. थोड्याच वेळात होणार मतदानाला सुरुवात!

सर्व ठिकाणची मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे. एकाच टप्प्यात मतदान पार पडणार असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणांवर ताण आहेच. त्यातच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांची पूर्तता करत मतदान पार पाडण्याचे आव्हानही प्रशासनासमोर आहे.

06:24 April 06

केरळमध्ये 69.95 टक्के, तामिळनाडूमध्ये 63.47 टक्के आणि पद्दुचेरीत 77.90 टक्के मतदान

केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात आज विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या तीनही ठिकाणी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.

Last Updated : Apr 6, 2021, 6:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.