ETV Bharat / bharat

Breaking News Live : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी स्कॉटलंडमधील बालमोरल किल्ल्यावर निधन - NATIONAL POLITICS

MAHARASHTRA MUMBAI POLITICAL LIVE UPDATES MARATHI BREAKING NEWS NATIONAL POLITICS GANESHOTSAV 2022

author img

By

Published : Sep 8, 2022, 6:37 AM IST

Updated : Sep 8, 2022, 11:13 PM IST

23:10 September 08

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी स्कॉटलंडमधील बालमोरल किल्ल्यावर निधन

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी स्कॉटलंडमधील बालमोरल किल्ल्यावर निधन झाले.

23:04 September 08

अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडाचा निकाल, तीन आरोपींना जन्मठेप

मालेगाव/मनमाड - अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडचा तब्बल अकरा वर्षानंतर निकाल लागला असुन मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायलयाने यातील तिन्ही आरोपीना जन्म ठेपेची शिक्षा. दिली असुन . 25 जानेवारी 2011 रोजी मनमाडला इंधन माफियानी केली हत्या केली होती यातील मुख्य आरोपी पोपट शिंदे यांचा आधीच मृत्यू झाला असुन यातील तिघांना जन्मठेप शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Body:-मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हात्यकांडचा आज तब्बल अकरा वर्षांनंतर निकाल लागला असून मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायलयाने तीन आरोपीना जन्म ठेपेची शिक्षा ठोठावली आहे मच्छिन्द्र सुरवडकर,राजू सिरसाट आणि अजय सोनवणे या तिघां आरोपीना कलम 302 अंतर्गत आजीवन करावास,353 अंतर्गत 2 वर्षे आणि कलम 506 अंतर्गत 7 वर्षे शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला 25 जानेवारी 2011रोजी अप्पर जिल्हाधिकारी सोनवणे मनमाड पासून जवळ असलेल्या इंधनाच्या अवैध अड्डयावर छापा मारण्यासाठी गेले असता इंधन माफियानी त्यांना जिवंत जाळून ठार मारले होते या घटनेने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरला होता.या प्रकरणात मुख्य आरोपी पोपट शिंदे सोबत मच्छिन्द्र सुरवडकर,राजू सिरसाट

22:35 September 08

भरधाव जीप भिंतीवर आदळून दोन ठार तर 5 जण गंभीर जखमी

सांगली - भरधाव जीपला अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाले आहेत.तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.नांद्रे येथे लोखंडी पोलला धडकून दर्ग्याच्या भिंतीवर गाडी आदळून हा भीषण अपघात घडला आहे.सांगलीहुन खटावकडे जात असताना गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.

नांद्रे येथील सांगली मार्गावर असणाऱ्या दर्गाह चौक येथे मध्यराञीच्या सुमारेस भरधाव जीपला भीषण अपघात होऊन दोन तरुण ठार झाले आहेत,तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.सांगलीहून खटावकडे भरधाव वेगाने जात असताना ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने दर्गाह समोरील बाहुबले यांच्या घरासमोरील लोंखडी पोलवर जीपने जोरदार धडक दिली.ही धडक इतकी भीषण होती,की
लोंखडी पोल वाकवत गाडी फरफटत गेली,त्यानंतर दर्ग्याच्या भिंतीवर जाऊन अदळली.ज्यामध्ये 21 वर्षीय तरूण जागीच ठार झाले आहेत.तर यावेळी गाड़ीत असणारे 5 तरुण गंभीर जखमी झाले आहेत,मृत व जखमी हे सर्व जण
खटाव येथील राहणारे आहेत

22:33 September 08

मुकेश अंबानी यांनी लालबागचा राजाचे घेतले दर्शन

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गणेश विसर्जनाच्या एक दिवस आधी मुंबईतील लालबागचा राजा गणेश पंडाल येथे प्रार्थना केली.

22:33 September 08

परतीच्या मुसळधार पावसामुळे जिल्हातील सखल भाग जलमय; तर रेल्वेसह मार्गावरील वाहतूक मंदावली

परतीच्या मुसळधार पावसामुळे जिल्हातील सखल भाग जलमय; तर रेल्वेसह मार्गावरील वाहतूक मंदावली..

ठाणे : गेल्या दोन दिवसापासून परतीच्या मुसळधार पावसामूळे जिल्ह्यातील सर्वच शहरातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम रेल्वेसह मार्गववरील वाहतुकीवर होऊन हजारो वाहने अडकून पडली आहे. तर जिल्ह्यात सर्वत्र पावसा कहर पाहता भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, अंबरनाथ, टिटवाळा , उल्हासनगर, बदलापूर शहरातील बहुतांश सखल भाग जलमय झाले आहेत.

20:51 September 08

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रने देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले

अभिनेता
अभिनेता

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेले नऊ दिवस भाविकांनी गर्दी केले आहे सर्वसामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटी आणि राजकीय मंडळींनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले आज अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रने देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

20:31 September 08

पुढीलल चार दिवस पावसाचा जोर वाढेल, हवामान खात्याचा इशारा; राज्य सरकार अलर्ट

मुंबई - येत्या चार दिवसांत मुसळधार कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन सतर्क झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जिल्हा प्रशासनाला सावधगिरीच्या सुचना दिल्या आहेत.

20:13 September 08

दमदार पावसाचा परिणाम मध्यरेल्वे २० मिनिटे उशिरा

आज पुन्हा मुंबईच्या उपनगरामध्ये आणि शहरात जोरदार पाऊस आल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईहून कल्याण कसारा कडे जाणाऱ्या जलद आणि दिव्या लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत

19:42 September 08

वसाहतवादाचे प्रतीक 'किंग्सवे' हा इतिहास असेल, कर्तव्यपथाच्या रुपाने नवे पर्व सुरू- पंतप्रधान मोदी

वसाहतवादाचे प्रतीक 'किंग्सवे' हा इतिहास असेल आणि कायमचा पुसला गेला आहे. कार्तव्यपथाच्या रूपाने नवे पर्व सुरू झाले आहे. मी देशातील सर्व लोकांचे अभिनंदन करतो कारण आपण वसाहतवादाच्या दुसर्‍या प्रतीकातून बाहेर आलो आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

19:39 September 08

18:55 September 08

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

काड्या गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याचा बळी घेतला. आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील उसेगाव परिक्षेत्रात ही घटना घडली.प्रेमपाल तुकाराम प्रधान (४५, रा. उसेगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक प्रेमलाल तुकाराम प्रधान हा जंगल परिसरात काड्या आणण्याकरीता गेला असता वाघाने त्याच्यावर हल्ला करून ठार केले. घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच घटनास्थळी पोहचून वनविभागाला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाची चमु घटनस्थळी दाखल होवून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले.

सदर घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले असून वनविभागच्या सुचनेकडे दुर्लक्ष केल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. तर जिल्हयात वाढते वाघाचे हल्ले बघता नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याकरिता ताडोबा येथून शार्पशुटर आणले गेले आहे. नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याकरिता वनविभागामार्फत उपायोजना करण्यात येत आहे. जंगल परिसरातील गावांना जंगलात न जाण्याच्या सुचना देण्यात येत आहे. मात्र नागरिक या सुचनेला न जुमानता जंगलात प्रवेश करीत आहेत. वाघाला जेरबंद करण्याकरिता दाखल झालेल्या यंत्रणेलाही अडथडे निर्माण होत आहे.

18:54 September 08

सोनाली फोगट प्रकरणातील एडविन न्युन्सला दणका, सर्व रेस्टॉरंट करणार बंद

गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने एडविन न्युन्स आणि लिनेट न्युन्स यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांचे नाईट क्लब, बार आणि रेस्टॉरंटच्या स्वरूपातील सर्व व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. एडविन न्युन्सचे नाव हे सोनाली फोगट प्रकरणात आले आहे.

17:20 September 08

इंग्लंडची राणी वैद्यकीय निगराणीखाली

आज सकाळी पुढील मूल्यमापनानंतर, राणी एलिझाबेथच्या डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी घेतली. त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली राहण्याची शिफारस केली.

17:03 September 08

मुंबई पोलिसांनी मूर्ती विसर्जनासाठी जाहीर केल्या सूचना

मुंबई पोलिसांनी शहरातील उद्याच्या अंतिम गणेश मूर्ती विसर्जनासाठी अॅडव्हायझरी जारी केली आहे. शिवाय, समित्यांनी शहरातील वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेऊन मिरवणुकीचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे

16:45 September 08

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात 26 साक्षीदार फितूर

16:15 September 08

CM Eknath Shinde Lalbagh Raja मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब घेतले लालबागच्या राजाचं दर्शन

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. सहकुटुंब त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी राज्यावरील सर्व संकट टळू दे हीच प्रार्थना केली असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

13:17 September 08

देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी अशा गोष्टी घडू नयेत, अजित पवार

देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी अशा गोष्टी घडू नयेत, अशी प्रतिक्रिया याकुब मेनन कबरीच्या सुशोभिकरणावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

13:15 September 08

बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा लोकांच्या प्रश्नाना वाचा फोडा, किशोरी पेडणेकर यांचा भाजपाला टोला

उद्धव ठाकरे यांना हिंदू धर्मीय संघटनांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांची लोकप्रियता वाढत आहे. यामुळे आशिष शेलार आणि भाजपा वाले बावाचळले आहेत. शेलार यांना २०१७ मध्येही पालिका जिंकता आली नव्हती. यामुळे ते असे बिनबुडाचे आरोप करत आहेत. लोकांच्या प्रश्नांवर त्यांनी वाचा फोडावी असे आवाहन मुंबईच्या माजी महापौर व शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

12:23 September 08

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर उत्तर सादर करण्याचे ईडीला न्यायालयाचे निर्देश.

मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्याचे ईडीला निर्देश

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात आज झाली सुनावणी

16 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्यासाठी मुदत

16 सप्टेंबरलाच सुनावणी होण्याची शक्यता

राऊत 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत

12:22 September 08

कोरोना काळात कबरीच सुशोभीकरण झालं : चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई - कोरोना काळात कबरीत सुशोभीकरण झालं. त्यामुळे तेव्हाचे तात्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची लक्ष देणं गरजेचं होतं. त्यावेळी पोलिसांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना ब्रीफिंग केलं असेल. मात्र त्यावेळी कारवाई झाली नाही. आता ही गोष्ट समोर आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. यामध्ये असलेल्या आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

10:08 September 08

आयकर विभागाची मोठी कारवाई, बोरिवलीसह सायन परिसरात छापेमारी सुरू

राजकीय देणग्यांमध्ये कोटयावधी रुपयांची अफरातफर झाल्याचा संशय असल्याने मुंबईतील बोरिवली आणि सायन परिसरात इतर विभागाने आज सकाळपासून छापेमारी सुरू केली आहे. बोगस पावत्यांच्या आधारे राजकीय देणग्यांमध्ये मोठ्या रकमेची अफरातफर झाल्याचा संशय आल्याने मुंबईत आयकर विभागाने ही कारवाई सुरू केली आहे.

09:16 September 08

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षित मोठी गफलत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेत मोठी गफलत

अमित शहांच्या सुरक्षेत मोठी गफलत ; खासदाराचा पीए सांगून अनोळखी व्यक्ती घालत होता घिरटया..

मुंबई दौर्यादरम्यानचा प्रकार

09:00 September 08

संजय राऊतांनी केला मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज

संजय राऊतांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून आज सुनावणीची शक्यता

08:16 September 08

राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

पुणे - सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत Heavy Rain In Maharashtra असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. राज्यात मुंबईसह ठाणे परिसारत पावसानं चांगलीच हजेरी Rain in Mumbai and Thane लावली. त्याचबरोबर रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातही पावसानं मुसळधार Heavy rain in Ahmednagar district हजेरी लावली आहे. गणेश विसर्जन आणि पुढील 3 ते 4 दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता Chance of heavy rain in Maharashtra हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आल आहे.

07:18 September 08

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकिय वर्तुळात सुरू आहेत

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकिय वर्तुळात सुरू आहेत. पण त्या अफवा आहेत. हे सगळं षड्यंत्र आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी दिली.राहुल गांधीच्या भारत जोडो अभियानाच्या पूर्व तयारीची बैठक नांदेडमध्ये पार पडली. या बैठकीसाठी माणिकराव ठाकरे नांदेडला आले होते. अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार झाली.

06:23 September 08

लालबागचा राजा
लालबागचा राजा

अमरावती शहारातील युवती लव्ह जिहाद अंतर्गत दोन दिवसांपासून गायब असल्याने खळबळ उडाली असताना अमरावती पोलिसांच्या यशस्वी प्रयत्नाने ती साताऱ्यात सापडली आहे. सातारा पोलिसंकडे ती सुखरूप आहे.
हमलपुरा परिसरारील 18 वर्षीय युवती दोन दिवसांपूर्वी मुस्लिम युवकासोबत पळून गेली होती. याबाबत राजापेठ पोलीस ठाण्यात तिच्या पालकांनी तक्रार दिली असता पोलिसांनी तिला पळवून नेणाऱ्या मुस्लिम युवकाला ताब्यात घेतले. दरम्यान त्या युवकाकची कसून चौकशी करून पोलिसांनी ती युवती साताऱ्याला असल्याची माहिती काढली. दरम्यान अमरावती पोलिसांनी सातारा पोलिसांशी संपर्क साधून त्या युवतीशी संपर्क साधला. सध्या ती युवती सातारा पोलिसांच्या निगरणीत असून गुरुवारी तिला अमरावतीत आणले जाणार आहे.

Last Updated : Sep 8, 2022, 11:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.