कलबुर्गी ( कर्नाटक ) : जिल्ह्यातील अफझलपूरजवळ भीमा नदीच्या काठी ( Afzalpur ) असलेल्या घट्टरगा ( Ghattaraga village ) गावात शाळेच्या इमारतीसाठी निधी ( collect funds for school building ) उभारण्यासाठी लिंगायत संताने ( Lingayat seer ) घरोघरी जाऊन मोहीम सुरू केली आहे. सोंडा मठाशी संलग्न असलेले डॉ. शिवानंद महास्वामी असे त्यांचे नाव असून यांनी प्रत्येकाचा दरवाजा ठोठावून शाळेसाठी निधी गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
बांधकामाला परवानगी नाही - हायस्कूलची सध्याची इमारत मोडकळीस येण्याच्या मार्गावर आहे. सत्ताधारी भाजप सरकारने पुनर्बांधणीसाठी निधी दिला असला तरी ही जागा मुझराई विभागाची असल्याने बांधकामाला परवानगी नाही. ही तांत्रिक अडचण ग्रामस्थांनी अनेकवेळा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्या समस्येकडे लक्ष दिले नाही.गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना भेटण्यासाठी योजना आखली होती, जेव्हा ते नुकतेच कलबुर्गी येथे आले होते. परंतु जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याने मुख्यमंत्र्याना भेटण्याचे नियोजन रद्द करण्यात आले.
25 लाखांहून अधिक रक्कम जमा - त्यानंतर ग्रामस्थ डॉ. महास्वामी यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांना शाळेसाठी मदत करण्याची विनंती केली. ज्ञानासाठी देणगी देण्याचे आवाहन करणारी "अक्षरा जोलिगे" मोहीम सुरू केली. डॉ. महास्वामी गावकऱ्यांसोबत परिसरातील लोकांच्या घरी भेट देत आहेत. जाती, धर्माच्या पलीकडे जाणारे लोक स्वामीजींचे स्वागत करत आहेत. त्यांच्या मदतीला गावकरी धावून आले आहेत. तसेच शक्यती मदत शाळेसाठी जमा करण्यात येत आहे. या उपक्रमातून 25 लाखांहून अधिक रक्कम जमा झाल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे स्थानिक आमदार एम.वाय. पाटील यांनी एक एकर जमीन देण्याचे मान्य केले आहे. ही मोहीम आणखी दोन दिवस चालविली जाणार असून ६० लाख रुपयांच्या देणग्या गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे. निधी गोळा करण्यासाठी गावकरी धार्मिक कार्यक्रमही आयोजित करत आहेत.
मोडकळीस आलेल्या इमारतीत मुलांना शिकण्यात अडचणी - डॉ महास्वामीजींनी सांगितले की, या उपक्रमाचे उद्दिष्ट पाच एकर जमीन खरेदी करण्याचे आहे. गावकऱ्यांनी तीन एकरांवर शाळेचा परिसर बांधण्याची योजना आखली असून इतर इमारतींच्या बांधकामासाठी दोन एकर जागा महसूल विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. सध्याची शाळेची इमारत मुजराई विभागाच्या हद्दीत असून ते नवीन इमारती बांधण्यास परवानगी देत नाहीत. मोडकळीस आलेल्या इमारतीत मुलांना शिकण्यात अडचणी येत आहेत, त्यामुळे देणग्या गोळा केल्या जात आहे असे स्वामीजींनी स्पष्ट केले. घट्टरगा गावात सरकारी जमीन नाही आणि जमीन खाजगी पक्षांकडून खरेदी करावी लागते. कलबुर्गी डेप्युटी डायरेक्टर फॉर पब्लिक इंस्ट्रक्शन (DDPI) यांनी सांगितले की, शाळेची जमीन खरेदी करण्यासाठी कोणतीही तरतूद नाही.