ETV Bharat / bharat

Lemon Price Hike : महाराष्ट्रातील लिंबाला मिळतोय ३०० रुपये किलोचा भाव.. उष्णता अन् सणासुदीमुळे लिंबू महागला.. - मध्यप्रदेश न्यूज

उष्मा वाढल्याने लिंबाचा वापर अधिक होतो, त्यामुळे त्याचे दरही वाढतात. मात्र, मध्यप्रदेशातील छिंदवाड्यात लिंबाचे भाव गगनाला भिडले आहेत. इथे एका लिंबाची किंमत थंड पेयापेक्षाही जास्त आहे. लिंबाचा भाव 250 ते 300 रुपये किलो आहे. त्यानुसार येथे एक लिंबू 25 ते 30 रुपयांना मिळत आहे. हा सर्व लिंबू महाराष्ट्रातून याठिकाणी येत आहे.

lemon
लिंबू
author img

By

Published : Apr 6, 2022, 9:05 PM IST

छिंदवाडा ( मध्यप्रदेश ) : मध्य प्रदेशात उष्णतेचा प्रकोप सुरूच आहे. कडक ऊन आणि उष्णता वाढताच लोकांना लिंबाची गरज भासू लागते. पण या कडक उन्हात जर तुम्ही लिंबूपाण्याने घसा शांत करण्याचा विचार करत असाल तर, त्यासाठी तुम्हाला तुमचा खिसा मोकळा करावा लागेल. कारण मध्यप्रदेशच्या छिंदवाडामध्ये 1 लिंबू 25 ते 30 रुपयांना मिळतो आहे. चला तर जाणून घेऊयात काय आहे कारण..

लिंबाचे भाव गगनाला भिडले : उष्मा वाढल्याने अचानक लिंबाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. तसेच किमतीतही विक्रमी वाढ झाली आहे. लिंबू विकत घेण्यासाठी लोक जेव्हा बाजारात पोहोचतात तेव्हा त्याची किंमत ऐकूनच त्यांचे दात आंबट होत आहेत. लिंबाचा भाव 250 ते 300 रुपये किलोने विकला जात असल्याचे ऐकून अनेकजण ते न घेताच परतत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी छिंदवाडा मंडईत 140 ते 150 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या लिंबाचा दर 250 ते 300 रुपये किलो झाला आहे. उष्णता वाढत असल्याने लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे. अशा स्थितीत छिंदवाडा येथे लिंबाची लागवड होत नसताना बाहेरून पुरवठा केला जात आहे. इतर राज्यांमध्ये आणि जवळपासच्या मंडईंमध्ये पूर्वीच्या तुलनेत काही प्रमाणात भाव वाढले आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशातील अनेक शहरांमध्ये लिंबाच्या दरात मोठी झेप दिसून येत आहे. स्थानिक मंडईंमध्ये दुकानदार 25 ते 30 रुपये किमतीचा 1 लिंबू देत आहेत.

थंडपेयापेक्षाही जास्त झाला एका लिंबाचा भाव.. उष्णता अन् सणासुदीमुळे लिंबू महागला..

कोल्ड्रिंकपेक्षा लिंबू महाग : जिथे कोल्ड ड्रिंकचा छोटा पॅक किंवा बाटली किंवा ग्लास 15 ते 20 रुपयांना मिळतो, अशी परिस्थिती आहे. तिथे छिंदवाडामध्ये 1 लिंबू त्यापेक्षाही महाग होत आहे. लिंबाच्या दरात अचानक झालेल्या या वाढीमुळे ग्राहकांचा खिसाही मोकळा होत आहे. नवरात्रीसोबतच रमजानचा सण आणि त्यानंतर अचानक वाढणाऱ्या उन्हामुळे लिंबाच्या मागणीतही वाढ झाल्याचे घाऊक भाजी बाजारातील व्यापाऱ्यांचे मत आहे. या कारणास्तव लिंबाच्या दरात वाढ झाली आहे. दुसरे कारण म्हणजे छिंदवाडा येथील लिंबू शेजारच्या महाराष्ट्रातून येतो. त्यामुळे लिंबू आता महाग झाले आहे.

उन्हाळ्यात लिंबू खूप फायदेशीर : उन्हाळ्यात लिंबू सेवन करणे खूप फायदेशीर आहे. लिंबाच्या वापराने तुम्ही तुमचे सौंदर्य तर वाढवू शकताच पण ते तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी देखील ठेवते. लिंबू पाण्याने उन्हाळ्यात आराम मिळतो. शरीरातील उष्णता आणि आर्द्रतेमुळे कमी होणारे क्षाराचे प्रमाणही लिंबू नियंत्रित करतो. तसेच पचनक्रिया सुरळीत राहते. लिंबूपाण्यात व्हिटॅमिन-सी आणि पोटॅशियमचे गुणधर्म भरपूर असतात. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. याशिवाय लिंबूमध्ये इतरही अनेक औषधी गुणधर्म आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.