ETV Bharat / bharat

Lata Mangeshkar Health Update : लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा, मात्र डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहणार - लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar Health Update) या गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. मात्र, सुधारणा दिसत असली तरी त्या आणखी काही दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लता मंगेशकर
लता मंगेशकर
author img

By

Published : Jan 27, 2022, 2:43 PM IST

Updated : Jan 27, 2022, 4:06 PM IST

मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar Health Update) या गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दीदींना दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आणखी काही दिवस त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

चुकीची माहिती नको

काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची खोडसाळ माहिती व्हायरल झाली होती. यावेळी मंगेशकर कुटूंबियांच्यावतीने कोणत्याही प्रकारे चुकीची माहिती पसरवू न देण्याचे आवाहन करण्यात आले होते. लता दीदींनी त्यांच्या ट्विटरवरून चाहत्यांना आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. लता मंगेशकर यांची जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोना निमोनियाची लक्षणे आढळून आली. बीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये डॉ. प्रतीत समदानी यांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. सध्या मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सतत प्रकृतीबाबत माहिती देणे शक्य होत नाही. तरी त्रासदायक अफवा पसरवू नका, असे आवाहन लता मंगेशकर यांनी ट्विटरवरून केले आहे.

  • Legendary singer Lata Mangeshkar is showing signs of improvement but will remain under observation of the team of doctors, reads an official statement.

    (File pic) pic.twitter.com/vcAdksfk33

    — ANI (@ANI) January 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Last Updated : Jan 27, 2022, 4:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.