ETV Bharat / bharat

UP Election 2022 : अनेक प्रमुख नेत्यांचा काँग्रेसला रामराम; प्रियंका गांधींसमोरील आव्हाने वाढतायेत - अनेक प्रमुख नेत्यांचा काँग्रेसला रामराम उत्तरप्रदेश निवडणूक 2022

बेहटमधील काँग्रेस आमदार नरेश सैनी यांच्यासह भाजपने डॉ. पूनम पौर्णिमा मौर्य ( Dr. Poonam Paurnima Maurya ) यांनाही आपल्या पक्षात घेतले. काँग्रेसने पूनमला 'लडकी हूं, लढा शक्ती हूं' घोषणेसह पोस्टरचा चेहरा बनवला होता. पक्षाने तिकीट न दिल्याचा आरोप त्यांनी केला.

leaders from congress leaving party before the up assembly election 2022
अनेक प्रमुख नेत्यांचा काँग्रेसला रामराम; प्रियंका गांधींसमोरील आव्हाने वाढतायेत
author img

By

Published : Jan 31, 2022, 10:07 PM IST

Updated : Jan 31, 2022, 10:57 PM IST

काँग्रेसला पहिला झटका आरपीएन सिंह ( RPN Singh ) यांनी दिला आहे. त्यांना पडरौना या परिसरात 'राजा साहेब' या नावाने ओळखले जाते. ते ओबीसी समाजातून येतात. तर याआधी जितिन प्रसाद ( Jitin Prasad ) कांग्रेसला सोडून भाजपमध्ये गेले. योगी सरकारने त्यांना आपल्या कॅबिनेटमध्येही स्थान दिले होते. दोन्ही नेता काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांचे जवळचे मानले जात होते.

या दोन नेत्यांव्यतिरिक्त आमदार राकेश सिंह (हरचंदपुर) आणि अदिति सिंह (रायबरेली सदर) हेदेखील भाजपमध्ये गेले आहेत. रायबरेली इंदिरा गांधी आणि त्यांच्यानंतर सोनिया गांधीचा गड मानला जातो. तसेच राकेश सिंह यांचे भाऊ विधानपरिषदेचे आमदार दिनेश प्रताप सिंह यांनीदेखील काँग्रेसला रामराम केला आहे.

बेहटमधील काँग्रेस आमदार नरेश सैनी यांच्यासह भाजपने डॉ. पूनम पौर्णिमा मौर्य यांनाही आपल्या पक्षात घेतले. काँग्रेसने पूनमला 'लडकी हूं, लढा शक्ती हूं' घोषणेसह पोस्टरचा चेहरा बनवला होता. पक्षाने तिकीट न दिल्याचा आरोप त्यांनी केला. प्रियांका गांधी यांनी महिला सक्षमीकरणावर भर देण्यासाठी ही घोषणा दिली. काँग्रेसमधून नेत्यांच्या पलायनाचा हा काळ यापुढेही कायम राहू शकतो. यूपी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राज बब्बर हेही पक्षात असमाधानी असल्याचे बोलले जात आहे. पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि त्यांची आमदार मुलगीही पक्ष सोडू शकते, अशी बातमी आहे.

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीआधी स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. आरपीएन सिंह 2014 आणि 2019मधील लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहे. 2019 मध्ये त्यांची डिपॉजिट जप्त झाले होते. याच यादीत आणखी एक नाव म्हणजे प्रमोद तिवारी. ते प्रतापपुरच्या रामपुर खासचे आमदार राहिले आहेत. 1980पासून त्यांना या जागेवर कधी पराभव स्विकारला नाही. 2018पासून ते राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत. रामपुर खास येथून आता त्यांची मुलगी अराधना मिश्रा आमदार आहे. इतक्या मोठ्या नेत्यांचा पक्ष सोडणे हा प्रियंका गांधींसाठी नक्कीच मोठा धक्का आहे. प्रियंका पहिल्यांदाच उघडपणे यूपी निवडणुकीची जबाबदारी घेत आहे. त्यांच्या खांद्यावर आशेचे ओझे आहे. सरचिटणीस या नात्याने पक्षाच्या कामगिरीची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या (प्रियांका-राहुल) राजकीय समजुतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काँग्रेसला पुढे नेण्याची क्षमता आहे की नाही, हे निवडणूक निकाल ठरवतील. मात्र, निवडणुकीपूर्वी असंतुष्ट नेते पक्ष सोडत असल्याची प्रियांका यांना अजिबात चिंता वाटत नाही. कदाचित याच कारणामुळे काँग्रेसचे प्रवक्ते आरपीएन सिंग यांनी पक्ष सोडल्यानंतर म्हणाले की, 'कायर' युद्ध लढू शकत नाहीत, पक्ष विचारधारा आणि सत्याची मजबूत लढाई लढत आहे. एकंदरीतच काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर उत्तरप्रदेशातील लढत आता सपा आणि 'काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील' भाजपमध्ये दिसत आहे.

Last Updated : Jan 31, 2022, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.