मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः मुंबईत करोना बाधितांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधाच्या अनुषंगाने विधीमंडळाचे कामकाज सुद्धा आजपासून दोन सत्रात करण्याचा निर्णय विधिमंडळ सचिवालयाने घेतला आहे.
Big Breaking News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे कामकाज आजपासून दोन सत्रात - Marathi tajya batmya
13:09 January 12
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे कामकाज आजपासून दोन सत्रात
12:31 January 12
आंदोलन करणाऱ्या ओबीसी बचाव समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल -
जालना - जमाव बंदीचा आदेश जुगारून ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या 22 प्रमुख कार्यकर्त्यांसह 150 आंदोलनकर्त्यांविरोधात परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी ओबीसी आरक्षण बचाव समितीच्यावतीने वाटुर फाटा येथे जालना-नांदेड महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात जिल्ह्याभरातून ओबीसी आंदोलक सहभागी झाले होते. कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लावण्यात आलेल्या जमावबंदीचा आदेश जुगार हे आंदोलन केल्या प्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन आणि नागरिकांस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास परतूर पोलीस करत आहे.
12:28 January 12
Breaking News - कल्याणमधील रामबाग परिसरातील 3 दुकानांना भीषण आग
कल्याणमधील रामबाग परिसरातील 3 दुकानांना भीषण आग लागली आहे. त्यात दुकानांत विक्रीसाठी ठेवलेले शेकडो जीवंत पक्ष्यांसह मासेही आगीत जळून खाक झाल्याने दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.