धनबाद (झारखंड) - धनबाद जिल्ह्यातील निरसा येथे शुक्रवारी पहाटे भूस्खलनाची घटना घडली आहे. (Landslide In Dhanbad). भूस्खलनामुळे २०० मीटर परिसरातील जमीन ५ फूट खाली गेली आहे. या परिसरात जमिनीला भेगा पडल्या असून, प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहे.
येथील अवैध खाणींमध्ये मजूर जातात कामाला - ईसीएल मुग्मा परिसरातील कापसरा आऊटसोर्सिंगमध्ये शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हे भूस्खलन झाले. (ECL Kapasara illegal mining). येथील अवैध खाणींमध्ये रोज अनेक मजूर कोळसा फोडण्यासाठी जातात. या भूस्खलनात येथील सुमारे दोन डझन लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने, भूस्खलनापासून अवघ्या 100 फूट अंतरावर झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ईसीएलच्या निष्काळजीपणामुळे घडली घटना? - प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सकाळी मोठा आवाज होऊन संपूर्ण परिसर जमिनीत गाडल्या गेला. दररोज डझनभर लोक येथे कोळसा काढण्यासाठी अवैध खाणींत जातात. गुरुवारी रात्रीही अनेक लोकं अवैध उत्खननासाठी गेले होते. आउटसोर्सिंग मॅनेजर आणि ईसीएलच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. एवढी मोठी घटना घडूनही पोलीस अद्याप घटनास्थळी पोहोचलेले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.