ETV Bharat / bharat

Labh Singh Ugoke : सफाई कर्मचाऱ्याच्या लेकाने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना चारली धूळ - लाभ सिंग उगोके आई सफाई कर्मचारी

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Punjab CM) यांना भदौड आणि चमकौर साहेब अशा दोन्ही मतदारसंघातून पराभवाचा जोरदार झटका नागरिकांनी दिला आहे. आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) उमेदवार लाभ सिंग उगोके (Labh Singh Ugoke) यांनी मुख्यमंत्री चन्नी यांचा तब्बल 37 हजार 500 मतांनी हरवले आहे.

labh singh ugoke mother
सफाई काम करताना लाभ सिंग उगोके यांची आई
author img

By

Published : Mar 12, 2022, 10:17 PM IST

चंदीगड - पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Punjab CM) यांना भदौड आणि चमकौर साहेब अशा दोन्ही मतदारसंघातून पराभवाचा जोरदार झटका नागरिकांनी दिला आहे. भदौर हा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांसाठी अत्यंत सुरक्षित मानला जात होता. परंतु, आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) उमेदवार लाभ सिंग उगोके (Labh Singh Ugoke) यांनी मुख्यमंत्री चन्नी यांचा तब्बल 37 हजार 500 मतांनी हरवले आहे. यामुळे पंजाबसह देशभर लाभ सिंग यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. लाभ सिंग उगोके हे गरीब घरातून येतात.

labh singh ugoke mother
सफाई काम करताना लाभ सिंग उगोके यांची आई

लाभ सिंग यांचा खडतर प्रवास -

पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आम आदमी पक्षा'कडून तिकीट मिळवणारे लाभ सिंग एका साध्या मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात नोकरी करतात. त्यांची आई एका सरकारी शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करते, तर वडील शेतात मजुरी करतात. लाभ सिंग यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतल आहे. लाभ सिंग उगोके २०१३ साली एक स्वयंसेवक म्हणून आम आदमी पक्षात दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांचा आपमध्ये प्रवास सुरू झाला.

अरविंद केजरीवाल यांच्याकडून कौतुक -

पंजाबमधील जोरदार विजयानंतर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना लाभ सिंग यांचा उल्लेख केला. कॅप्टन, सिद्धू, चन्नी यांना पराभूत करून पंजाबच्या नागरिकांनी चमत्कार केला, असे केजरीवाल म्हणाले. तसेच मुख्यमंत्री चन्नी यांचा पराभव कोणी केला, हे तुम्हाला माहीत आहे का? मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या लाभ सिंग उगोके यांनी मुख्यमंत्र्यांना पछाडले, असेही केजरीवाल म्हणाले.

labh singh ugoke mother
सफाई काम करताना लाभ सिंग उगोके यांची आई

मुलाकडून नागरिकांच्या अपेक्षा - लाभ सिंग यांची आई

मतदारसंघातील नागरिकांची लाभ सिंग यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. माझा मुलगा आमदार झाला असला तरी मी माझे सफाईचे काम चालूच ठेवणार आहे. या कमाईतूनच घर चालवणार आहे. लाभ सिंगने आम्हाला कधीच कोणत्या गोष्टीसाठी त्रास दिला नाही. यापुढेही तो लोकांची सेवाच करेल, अशी भावनिक प्रतिक्रिया लाभ सिंगची आई बलदेव कौर यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.