भोपाळ : मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यातून चिंताजनक बातमी समोर आली आहे. कुनो नॅशनल पार्कमधील तीन चित्त्यांना संसर्ग झाला आहे. चित्ता ओबानच्या मानेवर खोल जखम असल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चित्ताच्या मानेवरील कॉलर आयडी बाजुला केली, तेव्हा त्यांना चित्ताच्या मानेवर झालेल्या जखमेत किडे पडलेले दिसले. यानंतर वनविभाग अधिकाऱ्यांनी एल्टन आणि फ्रेडीलाही बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. यावर कुनो डीएफओ प्रकाश कुमार वर्मा म्हणाले की, जंगलात असलेल्या एकूण 10 चित्त्यांची तपासणी केली जात आहे. दरम्यान याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी कसून तपासणी करत आहेत. दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञ कुनो अभयारण्यातील सर्व चित्त्यांची आरोग्य तपासणी करणार आहेत.
कॉलर आयडीमुळे चित्त्यांना संसर्ग : कुनो अभयारण्यात चित्त्यांचा सातत्याने मृत्यू होत आहे. आतापर्यंत अभयारण्यातील 5 प्रौढ आणि 3 शावकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर शासन आणि प्रशासन पूर्णपणे चिंतेत पडले आहे. अलिकडेच आठवडाभरापूर्वी एका चित्त्याचा मृत्यू झाला होता. चित्त्याचे नाव सूरज होते. या नर चित्याचा मृत्यू मानेला खोल जखमेमुळे झाला होता. ही खोल जखम कॉलर आयडीमुळे झाली होती. सूरजच्या मृत्यूनंतर प्रशासन आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जंगलात फिरणाऱ्या चित्त्याची चाचणी घेतली असता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जंगलात फिरणाऱ्या ओबानच्या मानेवर खोल जखमा आढळून आल्या आहेत. त्यासोबतच वनविभागाने एल्टन आणि फ्रेडीलाही बेशुद्ध केले आहे. कुनो अभयारण्याचे डीएफओ प्रकाश कुमार वर्मा यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, जंगलात फिरणाऱ्या सर्व चित्त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
तेजस चित्त्याचा मृत्यू : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क मध्ये 11 जुलै रोजी नर चित्ता तेजसचा मृत्यू झाला होता. हा चित्ता निरीक्षण पथकाला जखमी अवस्थेत आढळून आला होता. दरम्यान त्यांच्यावर उपचार करण्यात आले. परंतु त्याचा मृत्यू झाला. तेजसच्या मृत्यूनंतर कुनो नॅशनल पार्कमध्ये 4 चित्ता आणि 3 शावक शिल्लक राहिले होते. चित्त्यांच्या मृत्यूबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मे महिन्यात झालेल्या सुनावणीत खंडपीठाने चिंता व्यक्त केली होती. केवळ एकाच ठिकाणी चित्त्यांचा बंदोबस्त करणे योग्य होणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
हेही वाचा -