ETV Bharat / bharat

Kota Student Suicide : विद्यार्थिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोटाच्या कोचिंग सेंटरवर गुन्हा दाखल - कोटा विद्यार्थ्याची आत्महत्या

Kota Student Suicide : कोटामध्ये 'नीट'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्यानंतर आता कोचिंग सेंटरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी कोचिंग सेंटरवर गंभीर आरोप केले होते.

Kota Student Suicide
Kota Student Suicide
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 11:05 AM IST

पहा मुलीचे वडील काय म्हणाले

जयपूर (राजस्थान) Kota Student Suicide : राजस्थानच्या कोटामध्ये 'नीट' परीक्षेची तयारी करणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीनं सोमवारी (१८ सप्टेंबर) आत्महत्या केली. आत्महत्येच्या एका दिवसानंतर तिच्या वडिलांनी कोटाच्या कोचिंग सेंटरवर, मुलीचा छळ केल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणी पोलिसांनी कोचिंग सेंटरवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

मृत्यूसाठी कोचिंग सेंटरला जबाबदार धरलं : उत्तर प्रदेशातल्या मऊ जिल्ह्यातील या १६ वर्षीय मुलीचा सोमवारी कोटाच्या कोचिंग सेंटरमध्ये मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतर तिचे वडील मंगळवारी कोटा येथे पोहोचले. त्यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी कोचिंग सेंटरला जबाबदार धरलं. कोचिंग सेंटर तिच्यावर अभ्यासासाठी दबाव आणत होतं, असं ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, कोचिंग सेंटर विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं डीएसपी धर्मवीर सिंह यांनी सांगितलं.

संस्थेतील शिक्षकांनी माझ्या मुलीचा छळ केला. त्यांनी तिच्यावर, तू अभ्यासात मागे आहे. तू नापास होशील, असा दबाव आणला. कोचिंग इन्स्टिट्यूटचे कर्मचारी माझा कोटा येथील हॉटेलच्या खोलीत पाठलाग करत होते. मी कोटा प्रशासनाशी संपर्क साधू नये अशी त्यांनी फोनवर धमकी दिली होती. मी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना ज्या फोनवरून कॉल आला तो नंबर प्रदान केला आहे - आत्महत्या करणाऱ्या मुलीचे वडील

सुसाइड नोट सापडली नाही : ही मुलगी गेल्या दीड वर्षापासून कोटाच्या विज्ञान नगर येथील कोचिंग सेंटरमध्ये 'नीट' परीक्षेची तयारी करत होती. ती यंदा बारावीत होती. या प्रकरणी कोटा शहराचे एएसपी भागवत सिंग हिंगड यांनी अधिक माहिती दिली. 'कोचिंग इन्स्टिट्यूटच्या बाहेर ही मुलगी उलट्या करताना दिसली. तिथून इतर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी तिला रुग्णालयात नेलं. तिथे सोमवारी संध्याकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलीच्या खोलीत कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. तिच्या पालकांनी संस्थेवर केलेल्या आरोपाचा तपास सुरू आहे. मंगळवारी दुपारी शवविच्छेदनानंतर मृतदेह मुलीच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. Students Write Wishes On Temple : कोटामधील नैराश्यग्रस्त विद्यार्थी 'या' मंदिराच्या भिंतीवर लिहितात नवस! वाचा स्पेशल स्टोरी
  2. Kota students suicide : कोटामध्ये लातूरसह बिहारच्या विद्यार्थ्याची तणावातून आत्महत्या, दोन महिने कोचिंगमधील परीक्षांवर बंदी लागू
  3. Kota Student Suicide : कोटामध्ये नंदूरबारच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, जेईई परीक्षेची करत होता तयारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.