जन्माष्टमीचा सण janmashtami 2022 भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो विशेष म्हणजे वृंदावन बरसाना मथुरा आणि द्वारका येथे जन्माष्टमी Janmashtami साजरी केली जाते जन्माष्टमीनिमित्त येथील मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रात्रीचे जागरही केले जाते जन्माष्टमी हा सण श्रीकृष्णाचा Lord Krishna जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो म्हणूनच या दिवशी श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते मात्र जन्माष्टमी उत्सवाच्या तारखेबाबत दरवर्षी मतभेद होतात यावेळीही जन्माष्टमीसाठी १८ ऑगस्ट आणि १९ ऑगस्ट हे दोन दिवस सांगण्यात येत आहे तेव्हा जाणून घेऊया जन्माष्टमीची तिथी शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत puja tithi muhurta
यावर्षी जन्माष्टमी 18 ऑगस्ट 2022 गुरुवार रोजी आलेली आहे या दिवशी सकाळी 09 वाजुन 21 मिनिटांनी अष्टमी तिथी सुरू होते आहे तर 19 ऑगस्टला शुक्रवारी सकाळी 10 वाजुन 59 मिनिटांनी अष्टमी तिथी समाप्त होणार आहे.
जन्माष्टमी 2022 विशेष मुहूर्त आणि राहुकाल स्थिती काय आहे ते जाणुन घेऊया
अभिजीत मुहूर्त दुपारी 12 वाजुन 05 मिनिटांनी सुरु होणार असुन 12 वाजुन 56 मिनिटांपर्यंत असणार आहे
वृद्धी योग हा बुधवार 17 ऑगस्ट रोजी रात्री 08 वाजुन 56 मि सुरु होणार असुन गुरुवार 18 ऑगस्ट रोजी रात्री 08 वाजुन 41 मि पर्यंत असणार आहे
राहुकाल योग हा 18 ऑगस्ट गुरुवारला 02 वाजुन 06 मि ला सुरु होणार असुन तो त्याच दिवशी 03 वाजुन 42 मि ला संपणार आहे
अष्टमी तिथीला जन्माष्टमी येते भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी रोहिणी नक्षत्रात झाला त्यामुळे अष्टमी तिथीला जन्माष्टमीची पूजा करण्याचा कायदा आहे पंचांगानुसार 18 ऑगस्टला रात्री 09 वाजुन 21 मिनिटांनी अष्टमी तिथी सुरू होत आहे या दिवशी ध्रुव आणि वृद्धी योगही तयार होत आहेत अष्टमी तिथी 19 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 10 वाजुन 50 मि समाप्त होईल अशा परिस्थितीत 18 ऑगस्टलाच जन्माष्टमीचा उपवास आणि पूजा केल्या जाईल
काही ज्योतिषांच्या मते भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता झाला होता आणि 19 ऑगस्टला अष्टमी तिथी दिवसभर राहील आणि याच दिवशी सूर्योदयही होईल. त्यामुळे जन्माष्टमी 19 ऑगस्ट रोजी साजरी करावी तर दुसरीकडे द्वारकाधीश मंदिर बांके बिहारी मंदिर आणि मथुरा येथील मंदिरांमध्ये 19 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे वैष्णव पंथ आणि स्मार्त पंथ मानणारे लोक जन्माष्टमी वेगवेगळ्या नियमांनी साजरी करतात
जन्माष्टमी पूजन पद्धती जन्माष्टमीला सकाळी उठून स्नान वगैरे करून दिवसभर उपवास करावा भगवान श्रीकृष्णाला गंगेच्या पाण्याने व दुधाने स्नान घालून नवीन वस्त्रे परिधान करून त्यांना मोरमुकुट बासरी वैजयंती माळा कुंडली तुळशीदळ कुंडल इत्यादींनी सजवावे भगवान श्रीकृष्णाच्या झुल्याला फुलांच्या माळांनी सजवा पूजेमध्ये श्रीकृष्णाला फळे फुले माखणा लोणी साखर मिठाई सुका मेवा इत्यादी अर्पण करा आणि धूप-दीप लावा यानंतर रात्री १२ नंतर पुन्हा श्रीकृष्णाची पूजा करून त्यांना झुल्यावर झुलवा आणि आरती करा व नारळ फोडा यानंतर सर्वांमध्ये प्रसादाचे वाटप करा जन्माष्टमीला पूजेनंतर भजन कीर्तनही केले जातात आणि अनेक मंदिरांमध्ये या दिवशी रात्रीचे जागरही केले जातात तर जम्मोत्सव साजरा करतांना गुलालही उधळला जातो
हेही वाचा krishna Janmashtami श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी व्रत करा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील