श्रावण Shravan 2022 हा व्रत वैकल्यांचा महिना असून, श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अगदी वेगवेगळे आहे. श्रावणात अनेक सणांची मांदियाळी असते. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध-बृहस्पती पूजनानंतर श्रावणी शुक्रवारी Shravani Friday जरा जिवंतिका Jara Jeevika Pujan पूजन केले जाते. जिवतीची पूजा, शुक्रवारची कहाणी आणि जिवतीची आरती यांबाबत जाणून घेऊया.
जरा जिवंतिका पूजन श्रावण सगळ्या सृष्टीचे सौंदर्य ओंजळीत घेऊन येतो. श्रावण अधिकच जवळचा वाटतो तो माहेरवाशिणीला. व्रतवैकल्य, मंगलमय वातावरण यांचा मेळ साधणाऱ्या श्रावणात शिवपूजनाला अत्यंत महत्त्व आहे. स्त्रिया उपवास, व्रते, उपासना, नामस्मरण करतात. धार्मिक पथ्ये पाळतात. अशा श्रावणातल्या निसर्गाने ओंजळीत न मावेल इतके दिल्यावर ते उत्साहाने इतरांशी वाटून घ्यावे, हा संदेश देण्यासाठीच श्रावणातील सण आणि व्रतवैकल्ये साजरी केली जातात. श्रावण महिना सुरू झाला, की देवघराजवळ जिवतीचा किंवा जीवंतिकेचा कागद चिकटविला जातो. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध बृहस्पती पूजन झाल्यावर येतो तो श्रावणी शुक्रवार. श्रावणी शुक्रवारी मुलांना औक्षण होते. जिवतीची पूजा होते. पिढ्यान पिढ्या हा वारसा असाच सुरू राहिला आहे. सन २०२२ मध्ये २९ जुलै, ५ ऑगस्ट, १२ ऑगस्ट व १९ ऑगस्ट रोजी श्रावणी शुक्रवार आहे.
जिवतीची पूजा जरे जीवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनी, रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोस्तुते असा श्लोक जिवतीची पूजा करतांना म्हटला जातो. श्रावणातल्या चारही शुक्रवारी जिवतीची पूजा करतात. ही पूजा संततीरक्षणार्थ मानली जाते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी, असे सांगितले जाते. या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे. या तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी. यासह २१ मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र घालावे. गंध, अक्षता वाहाव्यात. धूप, दीप अर्पण करावे. साखरेचा, चणे-फुटाण्यांचा आणि पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर आरती करावी. जिवतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे. मुले परगावी असल्यास चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल. त्या दिवशी देवीची ओटी भरावी.
जिवतीची कहाणी जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली. जिवंतिका पूजनामुळे घरात, आरोग्य, धन, सुख लाभते असे म्हटले जाते.
हेही वाचा BHAGWAT GEETA आजची प्रेरणा, दिवसाची सुरुवात करा गीतेतील प्रेरक विचारांनी