ETV Bharat / bharat

Todays Top News in Marathi: प्रदीप शर्मांच्या जामिन अर्जावर सुनावणी , 'या' महत्त्वाच्या घडामोडीवर राहणार नजर - माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांचे ( Tukaram Supe suspended ) निलंबन ते एसटी संप मागे ( ST Employees Strike ) अशा महत्त्वाच्या घडामोडी 20 डिसेंबरला घडल्या आहेत. तर माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माच्या जामिन अर्जावर सुनावणी अशा महत्त्वाच्या घटनांवर आज नजर राहणार आहे.

Todays Top News in Marathi
Todays Top News in Marathi
author img

By

Published : Dec 21, 2021, 5:25 AM IST

Updated : Dec 21, 2021, 5:41 AM IST

नवी दिल्ली - राज्यातील पेपर फुटीचे प्रकरण, एसटी कर्मचाऱ्यांच संप याबाबत निर्णायक मार्गावर वळण लागणाऱ्या घटना 20 डिसेंबरला घडल्या आहेत. त्या अनुषंगाने 21 डिसेंबरला महत्त्वाच्या घडामोडी आहेत. विविध घडामोडीदरम्यान आजचा दिवस कसा जाईल, हे जरुर वाचा.

कालच्या महत्त्वाच्या बातम्या

1. Tukaram Supe suspended - राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित; शासनाने काढले आदेश

मुंबई - शासनाने महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित ( Tukaram Supe suspended ) करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. सविस्तर वाचा-

2. अखेर 54 दिवसांनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई- राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे नेते अजयकुमार गुजर आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटल्याची लेखी निवेदनाद्वारे घोषणा आज (दि. 20 डिसेंबर) केली. कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन गुजर यांनी यावेळी केले. मात्र, आझाद मैदानात ठाण मांडून बसलेले कर्मचारी संपातून माघार घेण्यास तयार नाही, यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच ( ST workers strike ) राहणार आहे. सविस्तर वाचा-

3. Jaya Bachchans Curse : माझा शाप आहे, तुम्हाला वाईट दिवस येणार आहेत- संसदेत जया बच्चन यांचा भाजवर हल्ला

नवी दिल्ली- सुनेबाबत उल्लेख केल्यानंतर समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन या भाजप खासदारांवर संतापल्याचे ( Jaya Bachchan lost her cool in Rajya Sabha ) दिसून आले. मी तुम्हाला शाप ( curse to ruling party ) देते. तुम्हाला वाईट दिवस येणार आहेत, अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्ला केला. सविस्तर वाचा-

4. एमईएस ही महाराष्ट्र एकीकरण समिती नसून ती महाराष्ट्र भित्रट समिती, कर्नाटकचे मंत्री ईश्वरप्पा यांची टीका

बेळगाव (बंगळुरू) - सांगोली रायण्णाच्या पुतळाच्यी विटंबणा करणारे समाजकंटक आणि ज्या लोकांनी कन्नड झंड्याला जाळले त्यांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे, असा संताप कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री के.एस ईश्वरप्पा यांनी व्यक्त केला आहे. सविस्तर वाचा-

5. टीईटी परीक्षेतील घोटाळ्या प्रकरणी चौकशीचा अहवाल १५ दिवसांत सादर करा; मंत्री वर्षा गायकवाड यांचे निर्देश

मुंबई - टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने समिती गठीत केली आहे. ही समिती शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली असून, चौकशी अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad on TET Exam scam ) यांनी दिले आहे. याबाबत आज शालेय शिक्षण विभागाने शासन आदेश सुद्धा काढला आहे. सविस्तर वाचा

या महत्त्वाच्या घडामोडींवर असेल नजर

1. प्रदीप शर्मा यांच्या अर्जावर होणार सुनावणी

मुंबई -अँटिलिया स्फोटके प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने NIA अटक केली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करणे आणि या कटात सहभागी असल्याचा आरोप लावत त्यांना एनआयएने अटक केली होती. प्रदीप शर्मा यांना येण्याने अटक करून 6 महिने झाले आहे. सध्या प्रदीप शर्मा न्यायालयीन कोठडीत आहे. जामीन देण्यात यावा याकरीता प्रदीप शर्मा यांच्याकडून मुंबई NIA विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना कुठलाही दिलासा दिला नाही. पुढील सुनावणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. सविस्तर वाचा-

2. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी ( Maharashtra winter assembly session 2021 )

राज्याचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच ( MH Winter Session ) येत्या २२ डिसेंबर पासून सुरु होईल. त्या अनुषंगाने आज राजकीय व प्रशासकीय हालचाली होणार आहेत. दुसरा आठवड्यात २७ आणि २८ डिसेंबर रोजी अधिवेशनाचा तास भरेल. तसेच अधिवेशन वाढवायचे की नाही, यावर २४ डिंसेबरला होणाऱ्या संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल, असे परब यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) स्वतः अधिवेशनाला हजर राहणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीमुळे अधिवेशन मुंबईत घेतल्याचे ते म्हणाले. सविस्तर वाचा-

3. Local Body Elections Gondia : गोंदियात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक

गोंदिया - जिल्ह्यात उद्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची ( Local Body Elections Gondia ) तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली ( Gondia District Administration ) आहे. निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रावर आज (सोमवारी) पाठविण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भाग समजल्या जाणाऱ्या सालेकसा, अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी आणि देवरी या चार तालुक्यात मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे. तर गोंदिया, आमगाव, तिरोडा आणि गोरेगाव या चार तालुक्यात सकाळी ७.३० ते ५ वाजेपर्यंत वेळ रहाणार आहे. सविस्तर वाचा

4. Manora Nagar Panchayat Election 2021 : मानोरा नगर पंचायतचा निकाल

वाशिम - जिल्ह्यातील मानोरा नगर पंचायतच्या 13 जागांसाठी उद्या 21 डिसेंबर रोजी मतदान (Manora Nagar Panchayat Election 2021) झाले आहे. 22 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह भाजपा, वंचित स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरली आहेत. यावेळी मानोरा नगर पंचायतवर कुणाची सत्ता स्थापन होते हे 22 डिसेंबरच्या निकालावरून दिसून येणार आहे. सविस्तर वाचा-

5. Rishikesh Deshmukh Not Relieved: ऋषिकेश देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा नाही, 22 डिसेंबरला पुढील सुनावणी

मुंबई- 100 कोटी कथित वसुलीप्रकरणी ( 100 Crore Recovery Case ) ईडीने ऋषिकेश देशमुख यांना नोटीस बजावली ( ED Notice Rishikesh Deshmukh ) होती. मात्र, ऋषिकेश देशमुख यांनी ईडी कार्यालयात न जाता मुंबईच्या विशेष न्यायालयामध्ये ( Mumbai Special Court ) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर शुक्रवारी (दि.17) रोजी सुनावणी झाली. ऋषिकेश देशमुख यांच्याकडून ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी ( Adv Vikram Caudhari ) यांनी बाजू मांडली. मात्र, तरीदेखील न्यायालयाने दिलासा दिला नसून ( Rishikesh Deshmukh Not Relieved ), पुढील सुनावणी 22 डिसेंबर रोजी होणार आहे.

जाणून घ्या, तुमचा दिवस कसा असेल

2022 मध्ये मेष राशीवाल्यांना आयुष्य जगण्याची संधी? कसं असेल नवं वर्ष, जाणून घ्या

21 December Horoscope - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

21 December Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Aajchi Prerna : दिवसाची सुरुवात करा गीतेतील प्रेरक विचारांनी

Last Updated : Dec 21, 2021, 5:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.