ETV Bharat / bharat

जाणून घ्या, देशभरात दिवसभरात महत्त्वाच्या ठरू शकणाऱ्या घटना

author img

By

Published : Jan 15, 2021, 6:37 AM IST

राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. शिवाजीनगर येथील सीईओपीच्या मैदानावरील जम्बो हॉस्पिटल आजपासून तात्पुरते बंद करण्यात येणार आहे.

दिवसभरातील घडामोडी
दिवसभरातील घडामोडी

नवी दिल्ली - राज्यातील ग्रामपंचायतींचे कारभारी, शेतकरी आंदोलनाची नववी फेरी, काँग्रेसचा देशभरात राजभवन घेराव आंदोलन अशा घटनांनी दिवस ढवळून निघण्याची शक्यता आहे. ग्राहकांना सुवर्णरोखे खरेदी करण्याची आजपासून संधी उपलब्ध होत आहे. अशा महत्त्वाच्या घटनांचा हा संक्षिप्तपणे घेतलेला वेध आहे.

१. ग्रामपंचायत निवडणूक

मुंबई- राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी ते खासदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे निवडणुकीचे धुमशान अनेक गावात सुरू आहे. मतदान हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. प्रत्येक मतदार केंद्रावर पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

ग्रामपंचायत निवडणूक
ग्रामपंचायत निवडणूक

२. देशशभरात राजभवनांना काँग्रेस घेराव घालणार

नवी दिल्ली- केंद्र सरकारने देशात लागू केलेल्या कृषी कायद्यांना काँग्रेसने विरोध केला आहे. काँग्रेसने आज देशभरातील राजभवनांना घेराव घालण्यात येणार आहे. काँग्रेसने दिल्लीमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना तात्पुरती स्थगितील दिली असली तरी शेतकरी त्याबाबत पूर्ण समाधानी नाहीत.

राहुल गांधी
राहुल गांधी

३. शाळा बंद राहण्याचा आज शेवटचा दिवस

मुंबई - कोरोनाच्या नव्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. याआधी ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज महापालिका शाळाबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शाळा
शाळा

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य सरकारने इयत्ता नववी व बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र मुंबईसह, ठाणे आणि परिसरातील इतर महापालिकांनी ३१ डिसेंबरपर्यंत शाळा व कॉलेजे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

४- जम्बो हॉस्पिटल आजपासून बंद

पुणे- शिवाजीनगर येथील सीईओपीच्या मैदानावरील जम्बो हॉस्पिटल आजपासून तात्पुरते बंद करण्यात येणार आहे. कोरोनाबाधिंताची घटलेली संख्या, प्रतिबंधित क्षेत्रांचे कमी झालेले प्रमाण त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी झाला आहे. शहरातील खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये खाटांचे प्रमाण पुरेसे आहे. त्यामुळे जम्बो हॉस्पिटल बंद करण्यात येणार आहे. मात्र, रुग्णालयातील सुविधा तशाच असणार आहेत. या हॉस्पिटलसाठी पालिकेला दर महिना चार ते पाच कोटी रुपये खर्च करावे लागत होते.

जम्बो रुग्णालय
जम्बो रुग्णालय

५- लँडलाईनवरून मोबाईल करताना शून्य डायल करणे बंधनकारक

मुंबई - लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करम्यापूर्वी प्रत्येक वापरकर्त्याला शून्य डायल करणे बंधनकारक असणार आहे. भारतात फोन वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शून्य डायल करून कॉल केल्याने २५३ कोटींची नवीन मालिका काढणे शक्य होईल, असा सरकारने दावा केला आहे.

मोबोईल
मोबोईल

६. वूई युजर्ससाठी १५ जानेवारीपासून ३ जी सेवा काही शहरात बंद होणार

मुंबई- व्होडा डाफोन - आयडियाने नवीन वर्षात ३ जी सेवेला दिल्लीत बंद करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे १५ जानेवारीपासून दिल्लीतील ३ जी सेवा बंद होणार आहे. त्यामुळे दिल्लीतील वूईच्या ग्राहकांना नंबर पोर्ट करणे बंधनकार असणार आहे.

व्होडाफोन आयडिया
व्होडाफोन आयडिया

७. आजपासून सुवर्णरोखे खरेदीसाठी खुले

नवी दिल्ली- केंद्र सरकारकडून सुवर्ण रोख्यांच्या खरेदीवर प्रति ग्रॅम ५० रुपये सवलत दिली जाणार आहे. मात्र, ही सवलत केवळ ऑनलाईन आणि डिजीटल माध्यमातून करणाऱ्या ग्राहकांना देण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने सुवर्ण रोख्यांवरील सवलतीची माहिती जाहीर केली आहे. डिजीटल माध्यमातून खरेदी करण्याकरता सुवर्णरोख्यावरील प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ५,०५४ रुपये आहे. तर इतर माध्यमातून सुवर्ण रोखे खरेदी केल्यास प्रति ग्रॅमची किंमत ५,१०४ रुपये असणार आहे. सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार सार्वभौम सुवर्ण रोखे २०२०-२१ (श्रेणी १०) करिता अटी लागू असणार आहेत. हे सुवर्णरोखे ११ जानेवारी ते १५ जानेवारी २०२१ मध्ये खुले असणार आहेत. तर १९ जानेवारी २०२१ हे सेटलमेंटची तारीख असणार आ

सुवर्णरोखे
सुवर्णरोखे

८. एकनाथ खडसे आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार

पुणे- भोसरी येथील जमीन प्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. ईडीने त्यांना नोटीस पाठवत ३ डिसेंबरला चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचा समन्स बजावले होते. मात्र, कोरोनाची लागण झाल्याने ते हजर राहू शकले नव्हते. ईडीची नोटीस दिली तर, सीडी काढू असा खडसे यांनी यापूर्वी इशारा दिला होता. त्यामुळे खडसे आज काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे

९. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज अखरेचा कसोटी सामना

नवी दिल्ली- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना आज ब्रिस्बेने येथे होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघातील ११ खेळाडूंची यादी आज जाहीर होणे अपेक्षित होते. पण बीसीसीआयने चौथी कसोटी खेळणाऱ्या अंतिम खेळाडूंची यादी जाहीर केली नाही. ही यादी जाहीर न करण्यामागे जसप्रीत बुमराहची दुखापत हे कारण असल्याचे समोर आले होते.

भारत संघ
भारत संघ

१०- शेतकरी व सरकारमधील आज ९वी बैठक

नवी दिल्ली- शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात केंद्र सरकारला अद्याप यश मिळाले आहे. आज दिल्लीमधील शेतकरी व केंद्र सरकारमध्ये चर्चेची ९ वी बैठक आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज ५० वा दिवस आहे. कारकडून असे म्हटले होते की हा कायदा मागे घेता येणार नाही कारण बरेच शेतकरी त्यास अनुकूल आहेत. तर कायदा रद्द करण्याची मागणी शेतकरी नेते वारंवार करत राहिले. सर्वोच्च न्यायालयाने नवीन कृषी कायद्यांवर स्थगिती आणली असली तरी हे कायदे पूर्ण रद्द करावेत, अशी आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे.

शेतकरी आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.