25 सप्टेंबर रोजी जागतिक कन्या दिन ( Daughters Day 2022 ) साजरा केला जाणार आहे. मुली आपल्या आयुष्यात भरपूर प्रेम आणि आनंद आणतात. मुलींचा उत्सव महत्त्वाचा आहे. कारण, विकसनशील देशांमध्ये, मुलींना बर्याचदा ओझे म्हणून पाहिले जाते. परंतु, हा दिवस मुलींचे महत्त्व समजून घेण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. हा दिवस मुलींबद्दलचा जिव्हाळा आणि वचनबद्धता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. तर जाणून घेऊयात या दिवसाते महत्त्व. ( Celebrating World Daughters Day )
राष्ट्रीय कन्या दिवसाचा इतिहास ( History of National Girl's Day ) - यूएस मध्ये राष्ट्रीय कन्या दिवस दरवर्षी 26 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि आंतरराष्ट्रीय कन्या दिवस प्रत्येक सप्टेंबरच्या चौथ्या रविवारी साजरा केला जातो, जो 2022 मध्ये 26 सप्टेंबर रोजी येतो. अमेरिकेत 1932 मध्ये राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जात होता. कन्या दिवस भारतातील काही भागांमध्ये मुलींच्या संघर्षाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा करण्यात येतो. मुलींना मुलांपेक्षा कनिष्ठ मानले जाते होते. तसेच मुलींकडे ओझे म्हणून देखील पाहिले जात होते. त्यामुळे मुलींच्या अस्तित्वाची आणि कर्त्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी एक विशेष दिन साजरा करण्यास सुरूवात झाली.
राष्ट्रीय कन्या दिन महत्त्व ( National Girls Day Significance ) - विकसनशील देशांमध्ये मुलींना बर्याचदा ओझे म्हणून पाहिले जाते. परंतु, हा दिवस मुलींचे महत्त्व समजून घेण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. मुलगी म्हणजे चैतन्य, मुलगी म्हणजे आनंद. मुलगी म्हणजे मायेचा पाझर असते, बापाचा आधार असते. मुलगी कितीही मोठी झाली तरी ती तिच्या वडिलांसाठी परी असते. मुलगी ही जन्मदाती आहे. निसर्गाचं चक्र मुलीशिवाय अपूर्ण आहे. मुलगी प्रत्येक गोष्टीची सुरुवात आहे. तिच्याशिवाय सर्व काही व्यर्थ आहे. समाजात मुलांएवढचे स्थान मुलींनादेखील दिले जावे, तसेच मुलींचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाच्या उद्देशाने राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो.