ETV Bharat / bharat

Thivim constituency 2022 Election : थिविम मतदारसंघाच्या निवडणुकीत कोणाची होणार सरशी, वाचा मतदारसंघातील स्थिती - Thivim constituency 2022 Election

थिविम मतदारसंघात नेहमीच संमिश्र परिस्थिती राहिली आहे. कधीच हा मतदारसंघ कोण्या एका पक्षाचा बालेकिल्ला राहिला नाही. या मतदारसंघातून काँग्रेसचे दयानंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलकंठ हळणकर ( Thivim MLA Nilkanth Halarnkar ) , भाजपचे सदानंद तानावडे ( BJP Leader Sadanand Tanawade ) , किरण कंडोळकर आदी उमेदवार विधानसभेत आतापर्यंतच्या विविध विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते.

थिविम मतदारसंघ
थिविम मतदारसंघ
author img

By

Published : Jan 6, 2022, 5:26 PM IST

Updated : Jan 6, 2022, 5:46 PM IST

पणजी- थिविम हा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. पूर्णतः डोंगररांगाच्या कुशीत वसलेला आणि हिंदू संस्कृती जपणाऱ्या बहुसंख्य लोकांचा प्रदेश म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो. उत्तर गोव्यातील पर्यटकांसाठी महत्त्वाचे असणारे थिविम रेल्वे स्टेशन याच भागात असल्यामुळे या मतदारसंघाला ( Thivim constituency election 2022 ) विशेष महत्व आहे.

मतदारसंघातील राजकीय परिस्थिती
थिविम मतदारसंघात नेहमीच संमिश्र परिस्थिती राहिली आहे. कधीच हा मतदारसंघ कोण्या एका पक्षाचा बालेकिल्ला राहिला नाही. या मतदारसंघातून काँग्रेसचे दयानंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलकंठ हळणकर ( Thivim MLA Nilkanth Halarnkar ) , भाजपचे सदानंद तानावडे ( BJP Leader Sadanand Tanawade ) , किरण कंडोळकर आदी उमेदवार विधानसभेत आतापर्यंतच्या विविध विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते.

थिविम मतदारसंघातील स्थिती
थिविम मतदारसंघातील स्थिती

हेही वाचा-Goa Assembly Elections 2022 : डिचोली मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला, काँग्रेस कमकुवत

2017 ची विधानसभा निवडणूक
2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नीलकंठ हलनकर विजयी झाले होते. त्यांनी भाजप उमेदवार किरण कंडोळकर यांचा पराभव केला. या निवडणुकीत हलनकर यांना 11.099 तर कंडोळकर यांना 10.304 मते मिळाली होती. सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व भाजप आमदार नीलकंठ हलनकर करतात.

हेही वाचा-Panaji Assembly Election 2022 : राजधानी पणजी जिंकण्यासाठी भाजपातच चुरस; 'अशी' आहे मतदारसंघाची स्थिती

मतदारसंघातील मतदार संख्या-26, 575

2019 ला नीलकंठ हलनकर भाजपवासी झाले. तर कंडोळकर यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला होता. पक्षाने त्यांना गोवा फॉरवर्डचे कार्याध्यक्ष केले होते. मात्र नुकतेच त्यांनी आपल्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन तृणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते आगामी विधानसभा निवडणुकीत पत्नी कविता कंडोळकर यांना या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत. कविता कंडोळकर ( ZP member Kavita Kandolkar ) या थिविम जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत.

हेही वाचा-Goa Assembly Elections 2022 : गोव्यातील सध्याच्या घडीचे संख्याबळ आणि पक्षाची आजची स्थिती काय, यावर विशेष रिपोर्ट...

आगामी विधानसभा निवडणूक उमेदवार

  • भाजपा- नीलकंठ हलनकर
  • काँग्रेस - अद्याप उमेदवार घोषित नाही
  • तृणमुल काँग्रेस- कविता कंडोळकर
  • आप- दयानंद नार्वेकर

मतदारसंघातील समस्या
मतदारसंघातील ग्रामीण भागात आजही वीज आणि पाणी प्रश्न भेडसावत आहेत. ग्रामीण भागात आरोग्य व बेरोजगारीसारख्या समस्या आहेत.

मतदारसंघातील उद्योग
कोकण रेल्वेचे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन या भागात आहेत. त्याच्याशी निगडित वाहतूक, टॅक्सी व्यवसाय व हॉटेल हे महत्त्वाचे व्यवसाय आहेत. सोबतच भातशेती, मासेमारी, काजू बागायती हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत.

गोवा विधानसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष-

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीकडे ( Goa Assembly Elections 2022 ) सर्व देशाचे लक्ष लागलेले आहे. गोव्याची राजधानी पणजी ही राजकीय अस्थिरतेमुळे नेहमीच चर्चेत असते. गोवा विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. केजरीवालांचा आप तर ममताचा तृणमूलही आपले नशीब अजमावणार आहे. स्थानिक पक्षांनीही कंबर कसली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. मतदारांना आकर्षीत करण्यासाठी सर्व पक्ष तयारी करत आहेत.

Last Updated : Jan 6, 2022, 5:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.