मुंबई : इस्रोच्या चंद्रयान 3 ने इतिहास रचत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी सॉफ्ट लॅंडिंग केले. या मोहिमेच्या यशामागे चंद्रयान 3 चे प्रकल्प संचालक पी वीरामुथुवेल यांचा मोठा वाटा आहे. मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली. 'चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ जाणारा भारत पहिला देश बनला आहे, असे ते म्हणाले.
बालपणापासूनच इस्रोचे शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न : पी वीरामुथुवेल हे 2014 मध्ये इस्रो मध्ये सामील झाले होते. वीरामुथुवेल यांचे बालपणापासूनच इस्रोचे शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न होते, असे त्यांचे वडील पी पलानिवेल यांनी सांगितले. 2019 मध्ये त्यांनी चांद्रयान 3 चे प्रकल्प संचालक म्हणून सूत्रे हाती घेतली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे तत्कालीन प्रमुख के सिवन यांच्या नेतृत्वाखालील चंद्रयान - 2 मोहिमेच्या प्रकल्प संचालक वनिता यांच्यानंतर ते चंद्रयान 3 चे प्रकल्प संचालक बनले.
सामान्य कुटुंबात जन्म झाला : 46 वर्षीय वीरमुथुवेल यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1976 रोजी तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यात एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील रेल्वेमध्ये कर्मचारी होते. ज्यांनी दक्षिण रेल्वेमध्ये 30 वर्षांहून अधिक काळ तंत्रज्ञ म्हणून काम केले आहे. वीरमुथुवेल यांनी विल्लुपुरममधील रेल्वेच्या शिक्षण संस्थेतून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी एका खासगी पॉलिटेक्निक कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा मिळवला. वीरमुथुवेल यांनी त्यांच्या पदवीपूर्व शिक्षणासाठी चेन्नईतील एका खासगी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तसेच त्यांनी दुसर्या प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण सुरू ठेवले. वीरमुथुवेल यांनी प्रतिष्ठित आयआयटी मद्रासमधून डॉक्टरेट मिळवली आहे.
चंद्रयान 3 मिशनचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी : पी वीरामुथुवेल चंद्रयान 3 चे प्रकल्प संचालक होण्यापूर्वी इस्रोच्या एका टीमचे भाग होते. ही टीम 'नासा'ने प्रदान केलेल्या लेझर रेट्रोरिफ्लेक्टर अॅरेशी संबंधित सहयोग कव्हर करणाऱ्या सेटअपची अंमलबजावणी करायची. वीरामुथुवेल यांच्याकडे चंद्रयान 3 मिशनचे सर्वसमावेशक व्यवस्थापन करण्याची जबाबदारी होती. ते त्यांच्या नियोजन कौशल्यासह, प्रत्येक गोष्टीची काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्यासाठी ओळखले जातात.
हेही वाचा :