छत्तीसगड (रायपूर) - जवळजवळ दोनशे वर्षे भारतावर ब्रिटिशांनी राज्य केले. जे अत्याचार आणि दडपशाहीनं भरलेलं होते. या वर्षांत, ब्रिटिश 1857 मधील स्वातंत्र्याच्या पहिल्या लढ्यासह जवळजवळ प्रत्येक बंड दडपण्यात यशस्वी झाले. मात्र अठरागड परिसरातील आदिवासींचा इंग्रजांशी एक कठीण लढा होता आणि या लढाईच्या मुख्य नायकांमध्ये पृथ्वीराज चौहान यांचे वंशज, संबलपूरचे राजा सुरेंद्र साई आणि सोनाखानचे जमीनदार वीर नारायण सिंह यांचा समावेश होता. अठरागडच्या रहिवाशांसाठी वनउत्पादनाला विशेष महत्त्व होते. इथली जमीनसुद्धा खूप सुपीक होती. अठराव्या शतकातील अठरागडमध्ये सध्याचे पूर्व छत्तीसगड आणि पश्चिम ओडिशा यांचा समावेश आहे.
भारतीयांनी त्यांच्या आत्मसन्मानासाठी लढा चालू ठेवल्यानं, 1757 मध्ये प्लासीच्या लढाईने ब्रिटिशांना बंगालचे निर्विवाद स्वामी बनवले आणि 1818 पर्यंत ब्रिटिशांनी भारताचा अठरागड वगळता जवळजवळ प्रत्येक प्रदेश काबीज केला. अठरागड जो ब्रिटिशांच्या आवाक्याबाहेर राहिला. इंग्रजांनी तो काबीज करण्याचा खूप प्रयत्न केला. संबलपूरच्या गादीवर सुरेंद्र साईंच्या जागी स्वर्गीय राजा महाराज साईंची पत्नी राणी मोहन कुमारी यांना बसवण्यात आले. अठरागडचे राजे आणि जमीनदारांनी या हालचालीला विरोध केला. त्यानंतर सुरेंद्र साई, त्याचा भाऊ उदंत सिंह आणि काका बलराम सिंह यांना अटक करून हजारीबाग तुरुंगात ठेवण्यात आले.
हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : राणी अवंतीबाईंचा ब्रिटिश साम्राज्याविरोधातील विस्मरणात गेलेला लढा, जाणून घ्या..
सुरेंद्र साई आणि त्याच्या कुटुंबीयांना अटक केल्यानंतरही बंड सुरूच होते. सोनाखानचे बिंझवार जमीनदार नारायण सिंह यांनी 1856 साली तीव्र दुष्काळ पडला, तेव्हा गोदामाचे कुलूप तोडून गावकऱ्यांमध्ये अन्नधान्य वाटप केले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि रायपूर तुरुंगात ठेवण्यात आलं. परंतु काही दिवसातच नारायण सिंह पळून जाण्यात यशस्वी झाला आणि 30 जुलै 1857 रोजी भारतीय सैनिकांनी हजारीबाग जेलचा दरवाजा तोडला आणि सुरेंद्र साई व त्याच्या साथीदारांना पळून जाण्यास मदत केली. पळून गेल्यानंतर त्यांना सरनगडचा राजा संग्राम सिंह यांच्या वाड्यात आश्रय मिळाला.
सुरेंद्र साईला पकडण्यात अपयशी ठरलेल्या ब्रिटिशांनी मुत्सद्देगिरीचा वापर सुरू केला. सप्टेंबर 1861 मध्ये संबलपूर आणि कटकच्या कारागृहात कैद बंडखोरांची सुटका झाली. 22 नोव्हेंबर 1862 रोजी गव्हर्नर जनरल एल्गिन यांनी लंडनमधील ब्रिटीश सेक्रेटरी ऑफ स्टेटला माहिती दिली, की सुरेंद्र साई शरण आलेत. त्यानंतर, अठरागडच्या राजांनी आणि जमीनदारांनी ब्रिटिशांच्या आश्वासनांची पूर्तता होण्याची वाट पाहण्यास सुरुवात केली. मात्र, ब्रिटिशांनी प्रशासकीय संरचना बदलली आणि सुरेंद्र साईंनी पुन्हा एकदा सशस्त्र बंडाची योजना आखली. परंतु ब्रिटिशांना याची माहिती मिळाली आणि सुरेंद्र साईला मध्यप्रदेशातील खंडवा जवळ असीरगड किल्ल्यात अटक करण्यात आली. जिथे 17 वर्षे कैदेत राहिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
सुरेंद्र साईंप्रमाणे इंग्रजांनी सोनाखानाचे जमीनदार नारायण सिंह यांना अटक करण्यासाठी गावकऱ्यांना त्रास देणे सुरु केले आणि गावही पेटवले. आपल्या प्रियजनांवरील अत्याचार पाहून वीर नारायण सिंह शरण आले. 5 डिसेंबर 1857 रोजी त्यांना रायपूरमध्ये उपायुक्त इलियट यांच्याकडे सोपवण्यात आले आणि त्यांना रायपूरमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. इतिहासाच्या पानावर कुठेतरी हरवलेल्या या वीरांबद्दल सध्याच्या पिढीला फार कमी माहिती आहे. मात्र, असे म्हणता येईल की या भागातील राजे आणि जमीदारांनी ब्रिटिशांना याची जाणीव करून दिली होती, की ते त्यांचे स्वातंत्र्य इतक्या सहजरित्या गमावणार नाहीत.
हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : झारखंडमधील आदिवासींसमोर झुकले होते ब्रिटिश, वाचा सविस्तर...