ETV Bharat / bharat

टाइम मॅग्झिनच्या 100 प्रभावशील व्यक्तींच्या यादीत तुरुंगात असलेल्या खुर्रम परवेझला स्थान - khurram parvez time magazine

अमेरिकेतील टाइम मासिकेने सोमवारी 2022 मधील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली. या यादीत गेल्या वर्षापासून तुरुंगात असलेला काश्मिरी मानवाधिकार कार्यकर्ता खुर्रम परवेझ ( Khurram Parvez time magazine ) याच्या नावाचा समावेश आहे.

khurram parvez
खुर्रम परवेझ टाइम मॅगझिन
author img

By

Published : May 24, 2022, 8:20 AM IST

श्रीनगर (जम्मू काश्मीर) - अमेरिकेतील टाइम मासिकेने सोमवारी 2022 मधील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली. या यादीत गेल्या वर्षापासून तुरुंगात असलेला काश्मिरी मानवाधिकार कार्यकर्ता खुर्रम परवेझ ( Khurram Parvez time magazine ) याच्या नावाचा समावेश आहे. खुर्रमचे नाव नेत्यांच्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे, मात्र तो सामाजिक कार्यकर्ते आहे. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचीही नावे आहेत. मात्र, प्रभावशाली नेत्यांच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे नाव नाही.

हेही वाचा - Gyanvapi mosque case : जिल्हा न्यायालय आज ठरवणार सुनावणीची रूपरेषा

टाइम मासिकाने खुर्रमबद्दल थोडक्यात माहिती देखील दिली आहे. खुर्रम परवेझ हा एशियन फेडरेशन अगेन्स्ट इनवॉलेन्ट्री डिसएपिरेंसचा अध्यक्ष आहे, असे मासिकेत लिहिले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. काश्‍मीर प्रदेशातील मानवाधिकारांचे उल्लंघन आणि अन्यायाविरुद्ध तो बोलत असल्याने त्याला शांत करण्यात आले, असा दावा टाइम मासिकेने केला आहे. परवेझला बळजबरीने गप्प करण्याची ही पहिलीच वेळ नाही, तो सत्यासाठी बोलतो, त्यामुळे त्याच्यावर हल्ले होत असल्याचा दावा टाइम मासिकेने केला आहे. परवेझने अनेक भारतीय मुस्लिमांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, असे टाइम मासिकेने लिहिले आहे.

लष्कर-ए-तैयबाकडून खुर्रम परवेझने पैसे घेतल्याचा आरोप - 14 मे रोजी नवी दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयात खुर्रम परवेझविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. एनआयएनुसार, जम्मू आणि काश्मीरसह भारताच्या विविध भागांमध्ये दहशतवादाशी संबंधित कारवाया करण्यासाठी, भरती करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी लष्कर-ए-तैयबा या पाकिस्तानातील प्रतिबंधित दहशतवादी संघटनेकडून खुर्रम परवेझने पैसे घेतल्याचा आरोप आहे.

हेही वाचा - CCTV : सुरक्षा रक्षकाने अडवल्याने तृतीयपंथीयांनी बदडले, गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.