श्रीनगर जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात Shopian district of Jammu and Kashmir मंगळवारी अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात एका काश्मिरी पंडिताचा मृत्यू Kashmiri Pandit shot dead झाला आणि त्याचा भाऊ जखमी झाला brother injured in militant attack अशी माहिती पोलिसांनी दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने मृताचे नाव सुनील कुमार आणि जखमीचे पिंटू कुमार असे सांगितले आहे.
शोपियानच्या छोटीपोरा भागात एका सफरचंदाच्या बागेत दहशतवाद्यांनी नागरिकांवर गोळीबार केला. त्यात एकाचा मृत्यू झाला आणि एक जखमी झाला. दोघेही अल्पसंख्याक समुदायाचे आहेत. जखमी व्यक्तीला रुग्णालयात हलवण्यात आले आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले.
गेल्या आठवडाभरात काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी हल्ले वाढवले आहेत. रविवारी नोहट्टा येथे एका पोलीस कर्मचाऱ्याचा तर गेल्या आठवड्यात बांदीपोरा येथे एका स्थलांतरित मजुराचा मृत्यू झाला. बडगाम आणि श्रीनगर जिल्ह्यात सोमवारी दोन ग्रेनेड हल्ले झाले.