बंगळुरू- कर्नाटकमधील कोरोनाबाधितांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेबाबत ह्रदय विदीर्ण करणारी घटना समोर आली आहे. रामोहळ्ळी जवळील चिक्कालूर येथे नागरिकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. या रुग्णाच्या पत्नीने रुग्णालयात बेड मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर याचना केली होती.
बेड मिळत नसल्याने रुग्णाच्या पत्नीने थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर मदतीसाठी याचना केली. महिला संकटात असल्याचे पाहिल्यानंतर पोलिसांनी तिच्या पतीसाठी एम. एस. रामैय्या रुग्णालयात बेडची सोय केली. त्याठिकाणी महिलेच्या पतीला उपचाराकरिता रुग्णालयात पाठवून दिले. मात्र, रुग्णालयात बेड उपलब्ध होईपर्यंत खूप उशीर झाला होता. मात्र, वाटेतच कोरोना बाधिताचा मृत्यू झाला.
हेही वाचा-कर्नाटक : डोस न मिळूनही मोबाईलवर मिळाला लसीकरण पूर्ण झाल्याचा संदेश
दरम्यान, कर्नाटकमध्ये ऑक्सिजनच्या अभावी कोरोना बाधितांचे मृत्यू झाल्याचाही घटना समोर आल्या होत्या.
हेही वाचा- स्मशानभूमीबाहेर लावला मोदींसह भाजपा नेत्यांचा फोटो असलेला बॅनर