चिक्कामागलुरु: कर्नाटकातील विधान परिषदेच्या उपसभापतींनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एस.एल. धर्मेगौडा असे त्यांचे नाव आहे. ६४ वर्षीय धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला. पोलिसांना मृतदेह सापडलेल्या ठिकाणी धर्मगौडा यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोटही सापडली आहे.
सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. जेडीएसचे नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती धर्मेगौडा यांचा मृतदेह चिक्कमागलुरू जिल्ह्यातील कादूरजवळील एका रेल्वे रुळावर रात्री दोन वाजता आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे.
धर्मेगौडा यांच्याशी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी काही दिवसांपूर्वी गैरवर्तन केले होते. बेकायदेशीरपणे सभागृहाचे कामकाज चालवत असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदारांनी केला होता.