ETV Bharat / bharat

Karnataka CM Oath Ceremony : सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ - Karnataka Oath Ceremony

कॉंग्रेस ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याला 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांची उपस्थिती होती.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : May 20, 2023, 12:42 PM IST

Updated : May 20, 2023, 5:00 PM IST

बेंगळुरू : कर्नाटकात आजपासून काँग्रेसचे नवे सरकार अस्तित्वात आले आहे. नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक काँग्रेस नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. आज दुपारी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाची तर डी के शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. बंगळुरुमधील कांतीरवा स्टेडियममध्ये हा सौहळा पार पडला. यावेळी प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँगेसचे बडे नेते हजर होते.

आठ आमदारांना मंत्रिपदाची शपथ - सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कांतीरवा स्टेडियमवर शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही उपस्थित आहेत. त्याचबरोबर इतर दिग्गज नेतेही उपस्थित होते. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या आठ ज्येष्ठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

दिग्गज नेत्यांची हजेरी - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही बेंगळुरू येथे नवनिर्वाचित कर्नाटक सरकारच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. जातनिहाय, प्रदेशनिहाय आणि ज्येष्ठतेच्या आधारे पहिल्या टप्प्यात 8 आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली.

उद्धव ठाकरेंनी फिरवली पाठ - कर्नाटकमध्ये काँग्रेसचे बहुमताचे सरकार सत्तेवर आले असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार यांच्यासह मंत्रिमंडळाचा आज शपथविधी बेंगळुरच्या कांतीराव स्टेडियमवर पार पडला. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते, देशभरातील विविध पक्षाचे नेते या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते. महाराष्ट्रातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवले होते. उद्धव ठाकरे यांनी याकडे पाठ फिरवली असून, त्यांच्याऐवजी अनिल देसाई यांना या शपथविधीला पाठवण्यात आले होते.

  • Karnataka swearing-in ceremony | Karnataka Deputy CM-designate DK Shivakumar welcomes Tamil Nadu CM MK Stalin and other DMK leaders at Sree Kanteerava Stadium in Bengaluru. pic.twitter.com/TS3uVNcydI

    — ANI (@ANI) May 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेसची एकहाती सत्ता - कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत 224 जागांपैकी काँग्रेसने 135 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपला 66, जेडी एस 19 आणि इतरांना चार जागा मिळाल्या आहेत. कर्नाटकात काँग्रेसचे बहुमताने सरकार आले असून मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या यांची वर्णी लागली आहे. तर डी के शिवकुमार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. सिद्धरामय्या हे दुसऱ्यांदा कर्नाटकाचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह एकूण आठ आमदार सुरुवातीला शपथ घेणार असल्याचे समजते.

या बड्या नेत्यांची उपस्थिती - काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शपथविधीला भाजपशासित राज्य वगळता इतर मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठवले होते. याशिवाय विविध राज्यातील प्रादेशिक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही शपथविधी सोहळ्याला आमंत्रित केले होते. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टेलीन, सपाचे अखिलेश यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांना बोलावले होते. या शपथविधीला उद्धव ठाकरेबकाही वैयक्तिक कारणास्तव उपस्थित राहिले नाहीत, त्यांच्या ऐवजी शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई, माजी मंत्री सुभाष देसाई यांना पाठवण्यात आले होते.

केरळच्या मुख्यमंत्र्यांना डावळले- कर्नाटकमध्ये होत असलेल्या शपथविधी कार्यक्रमाला भाजपशासित राज्य वगळता सर्व मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठवले आहे. केरळमध्ये सत्तेत असलेल्या डाव्या लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना यात डावलण्यात आले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसचे पाऊल अपरिपक्व राजकारण आणि कमकुवतपणा दर्शवते, असे मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

  1. KCR On BRS Model In Country : विकासाचे बीआरएस मॉडेल भारतभर नेणार; बीआरएसने सुरू केली 288 मतदार संघात लढण्याची तयारी - केसीआर
  2. 2 thousand note ban : नागरिकांचे अर्थ गणित बिघडवणारी 2 हजारची गुलाबी नोट का झाली बंद, काय होता इतिहास
  3. Child At King Charles Coronation : राजा चार्ल्सच्या राज्याभिषेकासाठी 'या' सात वर्षांच्या मुलाला बोलावले होते, जाणून घ्या काय आहे खास

Last Updated : May 20, 2023, 5:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.