बंगळुरू : १९५६ साली आम्ही अक्कलकोट आणि सोलापूर महाराष्ट्राला देत बेळगाव आम्हाला घेतले आहे. त्यामुळे महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद ( Maharashtra Karnataka Border Dispute ) आमच्यासाठी यापूर्वीच संपलेला आहे, अशी मुक्ताफळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उधळली ( Karnataka CM Basavraj bommai ) आहेत. बोम्मई यांच्या या विधानाने आता पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. काश्मीर फाईल्स चित्रपटाप्रमाणे बेळगाव फाईल्स चित्रपट आला पाहिजे असं ट्विट शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut Tweet Belgaum Files ) यांनी केलं होत. त्यावर प्रत्त्युत्तर देताना बोम्मई बोलत होते. ते म्हणाले की, संजय राऊत यांचा हा एक स्टंट होता.
पण आता बोलण्यात अर्थ नाही : 1956 मध्ये बेळगावच्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आला. आमचे कन्नड भाषिक महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट येथे राहतात. मात्र, अशा प्रकारे बोलण्यात आता अर्थ नाही. बेळगावचे नाव घेऊन तिथल्या ( महाराष्ट्र ) समस्या वळवण्यासाठी राऊत असे बोलत असल्याचे ते म्हणाले. बेळगावात लोकशाहीची हत्या होत आहे. बेळगावमध्ये मराठी माणसांवर अत्याचार होत आहेत. त्यावर आता बेळगाव फाईल्स चित्रपट आला पाहिजे असं राऊत म्हणाले होते.