बंगळुरू : कर्नाटकात सिद्धरामय्या यांचे मंत्रिमंडळ स्थापन झाल्याने काँग्रेसने देशभरात जल्लोष साजरा केला आहे. आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. कर्नाटक विधानसभेतील 24 आमदार आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे कोणत्या आमदाराच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडणार आहे, याबाबतची माहिती ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी आम्ही देत आहोत.
-
Karnataka cabinet expansion: 24 MLAs to be sworn in as ministers today
— ANI Digital (@ani_digital) May 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/o7ctKp7kkG#Karnataka #CabinetMinisters #SiddaramaiahCabinet #Congress #RahulGandhi #SoniaGandhi pic.twitter.com/DO7GeeJKp2
">Karnataka cabinet expansion: 24 MLAs to be sworn in as ministers today
— ANI Digital (@ani_digital) May 26, 2023
Read @ANI Story | https://t.co/o7ctKp7kkG#Karnataka #CabinetMinisters #SiddaramaiahCabinet #Congress #RahulGandhi #SoniaGandhi pic.twitter.com/DO7GeeJKp2Karnataka cabinet expansion: 24 MLAs to be sworn in as ministers today
— ANI Digital (@ani_digital) May 26, 2023
Read @ANI Story | https://t.co/o7ctKp7kkG#Karnataka #CabinetMinisters #SiddaramaiahCabinet #Congress #RahulGandhi #SoniaGandhi pic.twitter.com/DO7GeeJKp2
मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार : कर्नाटक राज्यात विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री तर डी के शिवकुमार यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ टाकण्यात आली आहे. या दोघांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. सिद्धरामय्या यांच्या मंत्रीपदाच्या शपथेनंतर कोणत्या नेत्याची त्यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार यावरुन बरीच खडाजंगी सुरू होती. मात्र सिद्धरामय्या यांनी आज आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे जाहीर केले आहे. आज हा सोहळा बंगळुरूत पार पडत आहे.
कोणत्या आमदाराची लागली वर्णी : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात आज तब्बल 24 आमदार मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांमध्ये भालकीचे आमदार ईश्वर खांद्रे, बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, बसवन बागेवाडीचे आमदार शिवानंद पाटील, दावणगेरे उत्तरचे आमदार एस. एस. मल्लिकार्जुन, सेदामचे आमदार शरणप्रकाश पाटील, आमदार वेंकटेश, आमदार कृष्णा बायरेगौडा, आमदार एम सी सुधाकर, नागमंगलाचे आमदार चेलुवरायस्वामी, टी नरसीपूरचे आमदार डॉ एच सी महादेवप्पा, मुधोळचे आमदार आरबी तिम्मापूर, हवेरीचे आमदार रुद्रप्पा लमाणी, बिदरचे आमदार रहीम खान, गदगचे आमदार एच के पाटील हे आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
हेही वाचा -