नवी दिल्ली: एकादशीचे विशेष महत्त्व हिंदू धर्मात सांगण्यात आले आहे. अशा स्थितीत श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला कामिका एकादशी येते. यंदा एकादशीचे व्रत गुरुवारी म्हणजे आज आहे. हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार या एकादशीचे व्रत फार फलदायी असते.
अध्यात्मिक गुरु आणि ज्योतिषी शिवकुमार शर्मा यांच्या माहितीनुसार कामिका एकादशी म्हणजे इच्छा पूर्ण करणारी एकादशी आहे. भगवान विष्णूला श्रावण महिन्यातील कामिका एकादशी अत्यंत प्रिय आहे. कारण श्रावण महिना हा भगवान शिवाचा महिनाच ओळखला आहे. अशा स्थितीत भगवान शिव व विष्णु या दोघांमुळे या एकादशीचे महत्त्व आणखीन जास्त आहे. या एकादशीला भगवान शिव आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते. तसेच जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.
कामना एकादशीची पूजा कशी करावी? एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावीत. घरातील पुजाघरात दिवा लावावा. भगवान विष्णूला जलाने अभिषेक करावा. एकादशीचे व्रत करण्याचा संकल्प करून भगवान विष्णूची पूजा करावी. विष्णुचे स्तुती असलेल्या सहस्रनामाचा जप करावा. पुजेत दूध, दही, नैवेद्य वगैरे अर्पण करावे. विष्णु सहस्रनाम, गोपाल सहस्रनाम, ओम नमः भगवते: वासुदेवाय इत्यादी जप करत नामस्मरण करावे.
कामिका एकादशी शुभ मुहूर्त कोणता?
- कामिका एकादशीचा प्रारंभ: 12 जुलै (बुधवार) संध्याकाळी 05:59 वाजता.
- कामिका एकादशी समाप्ती: 13 जुलै (गुरुवार), संध्याकाळी 06:24 वाजता.
- 13 जुलै रोजी कामिका एकादशी व्रत आहे.
कामिका एकादशीत हे टाळा
- कामिका एकादशीच्या दिवशी मांस, कांदा, लसूण अशा पदार्थांचे सेवन करू नये.
- दारू, गुटखा, सिगारेट यांसारखे कोणतेही मादक पदार्थ घेऊ नका.
- पौराणिक मान्यतेनुसार मकर संक्रांती, अमावस्या, चतुर्दशी, पौर्णिमा आणि एकादशीच्या दिवशी शारीरिक संबंध जोडू नयेत. या दिवशी असे करणे पाप मानले जाते.
- हिंदू धर्मात प्रत्येक व्यक्तीचा आदर आणि प्रेमाने वागण्यास वागण्याची शिकवण आहे. याबाबत कामिका एकादशीला विशेष काळजी घ्या. कोणालाही दुखाविणारे किंवा अपशब्द वापरू नका. तसेच कोणावरही रागावू नका.
हेही वाचा-