नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ Congress Leader Kamal Nath यांनी सोमवारी सांगितले की, मला पक्षाध्यक्षपदासाठी रस Congress President Election नाही. राजस्थानमधील घडामोडीनंतर, कमलनाथ काँग्रेस अध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवारांमध्ये सामील होऊ शकतात, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत असताना त्यांनी हे विधान केलं आहे.
कमलनाथ यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी Congress President Sonia Gandhi यांची भेट घेतली. सूत्रांचे म्हणणे आहे की, ही बैठक राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर होती आणि हे संकट सोडवण्यासाठी कमलनाथ भूमिका बजावू शकतात.
मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कमलनाथ यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, 'मला अध्यक्षपदात रस नाही. मी फक्त (सोनिया गांधींना) नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे.'