जोशीमठ (उत्तराखंड): स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, अविमुक्तेश्वरानंद हे गुन्हेगार आहेत, त्यामुळे ते संत होण्यास पात्र नाहीत. ते म्हणाले की, स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी त्यांच्या हयातीत कोणालाही आपला उत्तराधिकारी बनवले नव्हते. त्यांच्या या वक्तव्यामुळे शंकराचार्यांच्या गादीवरून सुरू असलेला वाद इतक्यातच थांबणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
जोशीमठला धोका नाही: स्वामी गोविंदानंद सरस्वती म्हणाले की, अविमुक्तेश्वरानंद यांच्यामुळे जोशीमठमध्ये हा अनर्थ घडला आहे. ईटीव्ही भारतशी विशेष संवाद साधताना त्यांनी सांगितले की, जोशीमठला कोणताही मोठा धोका नाही. कालांतराने जोशीमठ येथील सर्व काही परिस्थिती ही ठीक होईल. स्वामी गोविंदानंद सरस्वती म्हणाले अविमुक्तेश्वरानंद हे संताच्या लायकीचे नाहीत. ते गुन्हेगार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकांनी केला विरोध: जोशीमठ भागाचा दौरा करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी नरसिंह मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले होते, त्यांच्यासोबत स्वामी गोविंदानंद सरस्वतीही पूजेला आले. ब्रह्मचारी मुकुंदानंद सरस्वती यांना कळताच तेही तेथे पोहोचले. जेथे स्थानिक लोकांनी ब्रह्मचारी मुकुंदानंद सरस्वती यांना सांगितले की स्वामी गोविंदानंद स्वरस्वती यांनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यासाठी अपशब्द वापरले आहेत. त्यानंतर स्थानिक लोकांनी स्वामी गोविंदानंद सरस्वती यांना विरोध केला. पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले.
ते तर सर्वोच्च न्यायालयातही खोटे बोलले: स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी सांगितले की, जोशीमठ येथे पूर्वी एक फसवा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ते म्हणाले की, अविमुक्तेश्वरानंद सर्वोच्च न्यायालयातही खोटे बोलले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला त्यांच्या कार्यक्रमावर बंदी घालावी लागली. आखाड्याच्या लोकांनीही अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर बहिष्कार टाकल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, स्वामी स्वरूपानंद यांनी त्यांच्या हयातीत कधीही कोणालाही आपला उत्तराधिकारी बनवले नाही किंवा त्यांनी कोणाला अभिषेकही केला नाही. त्यांनी कधीही कोणालाही शंकराचार्य म्हणून घोषित केले नाही.
गेल्या वर्षी झाला होता वाद: दरम्यान, गेल्या वर्षी शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती आणि ज्योतिष पीठ ब्रह्मलीन झाल्यानंतर त्यांचे शिष्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना नवीन उत्तराधिकारी बनवण्यात आले. मात्र अखिल भारतीय आखाडा परिषद अविमुक्तेश्वरानंद यांना शंकराचार्य म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. त्याचवेळी गंगा नदीच्या सातत्य आणि स्वच्छतेसाठी काम करणारी संस्था मातृ सदनचे संत स्वामी शिवानंद सरस्वती यांनी अविमुक्तेश्वरानंद यांच्या समर्थनार्थ पुढे येऊन पाठिंबा दिला होता.
हेही वाचा: उत्तराखंड बनणार भारतातील सर्वाधिक बोगदे असलेले राज्य