कोलकाता - नारदा घोटाळा प्रकरणी आज सकाळी सीबीआयकडून तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा आणि सोवन चटर्जी या चार नेत्यांना अटक करण्यात आली होती. विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीशांनी चारही नेत्यांचा जामीन मंजुर केला आहे.
टीएमसी नेत्यांच्या अटकेनंतर कार्यकर्त्यांनी सीबीआय कार्यालयाला घेराव घातला होता. यातच मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील थेट सीबीआय कार्यालयात पोहचल्या होत्या. तब्बल चार तास त्या सीबीआय कार्यालायात होत्या. विधानसभा अध्यक्ष आणि सरकारची परवानगी न घेता मंत्र्यांना अटक कशी केली, असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. टीएमसीचे नेते आणि मंत्र्यांना बेकायदेशीरपणे अटक केली. तर आता मलाही अटक करा, असेही त्या अधिकाऱ्यांना म्हणाल्या.
काय आहे नारदा घोटाळा?
पश्चिम बंगाल 2016 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नारदा स्टिंग टेप सार्वजनिक करण्यात आला होता. यामध्ये टीएमसीचे मंत्री आणि आमदार एका कंपनीकडून रोख पैसे घेताना दिसत होते. हे स्टिंग ऑपरेशन नारदा न्यूज पोर्टलच्या मॅथ्यू सॅम्युअल यांनी प्रसारीत केलं होतं. कोलकाता उच्च न्यायालयाने 2017 मध्ये या स्टिंग ऑपरेशनची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या स्टिंग ऑपरेशनमध्ये टीएमसीच्या 13 नेत्यांची आहेत. या 13 नेत्यांमधील काही नेते यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये सामील झाली आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) सुद्धा याप्रकरणात तपास करत आहेत.
हेही वाचा - नारदा घोटाळा : नेत्यांच्या अटकेनंतर ममता दीदी थेट पोहचल्या सीबीआयच्या कार्यालयात