ETV Bharat / bharat

JP Nadda : 'इंदिरा गांधींनी ज्यांना तुरुंगात टाकले तेच आज..' जेपी नड्डांची विरोधकांवर टीका - लालू प्रसाद यादव

पाटण्यातील विरोधी पक्षांच्या बैठकीवर भाजपने निशाणा साधला आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ओडिशात बोलताना नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचा समाचार घेतला. नड्डा म्हणाले की, ज्यांना इंदिरा गांधींनी तुरुंगात टाकले तेच आज काँग्रेसशी हातमिळवणी करत आहेत.

JP Nadda
जेपी नड्डा
author img

By

Published : Jun 23, 2023, 3:48 PM IST

Updated : Jun 23, 2023, 4:08 PM IST

भवानीपटना (ओडिशा) : पाटणा येथील विरोधी पक्षांच्या बैठकीवरून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका केली आहे. नड्डा यांनी त्यांना आठवण करून दिली की, आणीबाणीच्या काळात काँग्रेसच्या नेत्या आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना अनेक महिने तुरुंगात टाकले होते.

  • #WATCH | Odisha: Rahul Gandhi's grandmother Indira Gandhi had put Lalu Yadav and Nitish Kumar in jail but today they are welcoming Rahul Gandhi in Patna. I wonder as to what has happened in politics: BJP national president JP Nadda, on #OppositionMeeting pic.twitter.com/eJQgHIjwRJ

    — ANI (@ANI) June 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'कॉंग्रेसचा विरोध करणाऱ्यांचे काय झाले?' : येथे एका सभेला संबोधित करताना नड्डा म्हणाले की, आज जेव्हा सर्व विरोधी पक्ष पाटण्यामध्ये एकत्र येत आहेत, तेव्हा काँग्रेसला विरोध करून राजकारण करणाऱ्या नेत्यांचे काय झाले आहे, याचे त्यांना आश्चर्य वाटते. पाटणा येथे विरोधी पक्षांच्या अनेक प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. यामध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला कडवे आव्हान देण्याच्या उद्देशाने मजबूत आघाडी तयार करण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव या बैठकीचे आयोजन करत आहेत.

उद्धव ठाकरेंवर टीका केली : नड्डा पुढे म्हणाले की, 'हेच लालू प्रसाद यादव इंदिरा गांधींमुळे 22 महिने तुरुंगात राहिले. नितीशकुमार 20 महिने तुरुंगात होते. इंदिरा गांधींनीच त्यांना तुरुंगात टाकले होते.' उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत नड्डा म्हणाले की, 'बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की ते शिवसेनेला काँग्रेस कधीच होऊ देणार नाही. ज्या दिवशी कॉंग्रेसशी हातमिळवणी करावी लागेल त्या दिवशी ते आपले दुकान बंद करतील. आज बाळासाहेब ठाकरे विचार करत असतील की, त्यांच्या मुलाने दुकान बंद केले आहे.'

या प्रमुख नेत्यांची उपस्थिती : या बेठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक नेते उपस्थित आहेत.

हेही वाचा :

  1. Patna Opposition Meeting: विरोधकांची एकजूट कधीच शक्य नाही, पाटणामध्ये फोटो सेशन आहे - अमित शाह
  2. Patna Opposition Meeting: नितीश कुमारांच्या लग्नातील मिरवणुकीचा नवरदेव कोण?'.. विरोधी पक्षांच्या बैठकीवर भाजपचा प्रश्न
  3. Kharge Address Party workers : ... तर संपूर्ण देशात लोकसभा निवडणूक जिंकू - काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे

Last Updated : Jun 23, 2023, 4:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.