ETV Bharat / bharat

झारखंडमधील महिला उद्योजकांची भरारी; 'पलाश'चे पदार्थ पोहोचणार जगभरात!

author img

By

Published : Nov 10, 2020, 6:00 AM IST

आपल्या सासरी पोहोचताच शोभा दिदींसमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला. यातील सर्वात मोठी समस्या होती, ती आर्थिक अडचण. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शोभा दिदींनी कंबर कसली. त्यांना बँकेचेही कर्जरुपी सहाय्य मिळाले. आणि मग सुरू झाली सुरण, कैरी, मिरची आणि कारल्याच्या लोणच्याची प्रेरणादायी कथा!

Jharkhand's Palash's products will reach every corner of the world with help of Flipkart and Amazon
झारखंडमधील महिला उद्योजकांची भरारी; 'पलाश'चे पदार्थ पोहोचणार जगभरात!

रांची : छोट्याश्या खोलीत किंवा गॅरेजमध्ये तयार झालेल्या कंपन्यांनी कशा प्रकारे जागतिक स्तरावर कोट्यावधींची उलाढाल केली, हे आपल्याला माहित आहे. अगदी तशाच प्रकारे, झारखंडच्या विविध गावांमधील छोट्याशा घरांमध्ये तयार होणारी उत्पादने आता जगभरात पोहोचणार आहेत.

रांचीच्या नामकुम प्रांतात अवघी ३०० घरं असणारं कुटियातू नावाचं गाव आहे. या गावातील शोभा दिदीही आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होणार आहेत. त्यांच्या संघर्षाची कथा सुरू होते, ती २००८मध्ये. आपल्या सासरी पोहोचताच शोभा दिदींसमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला. यातील सर्वात मोठी समस्या होती, ती आर्थिक अडचण. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शोभा दिदींनी कंबर कसली. त्यांना बँकेचेही कर्जरुपी सहाय्य मिळाले. आणि मग सुरू झाली सुरण, कैरी, मिरची आणि कारल्याच्या लोणच्याची प्रेरणादायी कथा!

छोट्याश्या खोलीत सुरुवात..

या व्यापारातून थोडे पैसे मिळताच शोभा दिदींनी एक छोटेसे घर बांधले. यामधील खोली छोटी असली, तरी एका मोठ्या फॅक्टरीएवढीच महत्त्वाची आहे. एसएचजीच्या महिला कर्मचारी याठिकाणी एकत्र जमतात. मेहनतीने तयार केलेले लोणचे याठिकाणी डब्ब्यांमध्ये भरले जाते. कोणी हे डबे सील करतं, तर कोणी त्यावर स्टिकर चिटकवतं. गेल्या १२ वर्षांपासून सुरू असलेली ही मेहनत, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव चमकवणार आहे.

महिलांचे आयुष्य बदलले..

केवळ शोभा दिदीच नव्हे, तर या समूहातील सर्वच महिलांचे आयुष्य बदलले आहे. गावातील राहणीमान सुधारत आहे. तसेच, कित्येक दिदींची मुले आता शाळेतही जाऊ शकत आहेत. कालपर्यंत शहर आणि गावच्या बाजारांमध्ये 'हंडिया' विकणाऱ्या या महिला, आता या कंपनीत काम करत आहेत, आणि त्यांनी बनवलेली उत्पादने आता जगभरात पोहोचणार आहेत..

राज्य सरकारची मदत..

या महिलांच्या स्वप्नांना भरारी देण्यात झारखंडच्या ग्रामीण विकास विभागाचे मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच या दिदींनी तयार केलेल्या उत्पादनांना 'पलाश' अशी ओळख मिळाली आहे. त्यांची उत्पादने आता सचिवालयासोबतच मोठमोठ्या सरकारी कार्यालयांमध्ये डिस्प्ले काऊंटरवर ठेवण्यात आली आहे. आणि मोठे अधिकारीही ही उत्पादने वापरु लागले आहेत.

३७ हून अधिक प्रकारचे पदार्थ..

पलाशच्या उत्पादनांमध्ये मोरिंगा टी, बकरीचे टेट्रा पॅकमधील दूध, कित्येक प्रकारचे मध, ब्राऊन राईस, हर्बल साबण, चिंचेचा केक, जांभळाचं व्हिनेगर, महुआचे पीठ, कित्येक प्रकारची लोणची असे एकूण ३७ हून अधिक पदार्थांचा समावेश आहे. लवकरच, अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि रिलायंस मार्टच्या मदतीने ही उत्पादने जगभरात पोहोचणार आहेत. यामुळे २०२३-२४ पर्यंत या कंपनीची उलाढाल एक हजार कोटींपर्यंत होण्याचा अंदाज आहे.

महिला उद्योजक..

शोभा दिदींप्रमाणेच झारखंडमधील सुमारे एक लाख नऊ हजार महिला आता उद्योजक झाल्या आहेत. असं म्हणतात, की जिथे महिला सक्षम असतील, तो समाज सशक्त होतो. झारखंडमध्ये तर हे होण्यास सुरुवात झाली आहे.. आता या छोट्याश्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर होऊन, त्याच्या फांद्या देशभरात पोहोचणे आवश्यक आहे...

हेही वाचा : चिमण्यांसाठी जीवन समर्पित करणारा अवलिया!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.