ETV Bharat / bharat

जेईई मेन्सच्या तिसऱ्या फेरीचा निकाल जाहीर; 17 विद्यार्थ्यांनी केली शंभरी पार - jee mains

अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन्सच्या तिसऱ्या फेरीस सतरा उमेदवारांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. राष्ट्रीय चाचणी एजन्सीने (एनटीए) त्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला.

jee
jee
author img

By

Published : Aug 7, 2021, 11:12 AM IST

नवी दिल्ली - अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन्सच्या तिसऱ्या फेरीस सतरा उमेदवारांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. राष्ट्रीय चाचणी एजन्सीने (एनटीए) त्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला.

शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आंध्र प्रदेशचे कर्णम लोकेश, दुग्गनेनी वेंकट पनीश, पासला वीरा शिवा आणि कंचनपल्ली राहुल नायडू, बिहारचे वैभव विशाल, राजस्थानचा अंशुल वर्मा, दिल्लीचा रुचिर बंसल आणि प्रवर कटारिया, हरियाणाचा हर्ष आणि अनमोल, कर्नाटकचे गौरव दास यांचा समावेश आहे. याचबरोबर मदुराईचे पोलु लक्ष्मी, साईं लोकेश रेड्डी, आदर्श रेड्डी तसेच तेलंगाणाचा वेलावली वेंकट आणि उत्तर प्रदेशाची पाल अग्रवाल व अमेय सिंघलही उत्तीर्ण झाले आहेत.

7.09 लाख विद्यार्थ्यांनी दिली परिक्षा

ही परिक्षा देशातील 334 शहरों में 915 केंद्रांवर पार पडली. याचबरोबर देशाबाहेर 12 केंद्रांवर बहरीन, कोलंबो, दोहा, दुबई, काठमांडू, क्वालांलापूर, लागोस, मस्कत, रियाध, शारजा, सिंगापूर और कुवेत मध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. या परिक्षेत एकूण 7.09 लाख विद्यार्थी बसले होते. राज्यातील कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सांगली आणि सातारा या कोरोनाचे जास्त प्रमाण असलेल्या जिल्ह्यात 25 आणि 27 जुलैला परिक्षा घेतली होती. मात्र, तेव्हा उपस्थित न राहिलेल्या 1,899 विद्यार्थ्यांची परिक्षा 3 आणि 4 ऑगस्ट ला आयोजित केली होती.

सतरा विद्यार्थ्यांनी मिळवले 100 टक्के गुण

आंध्र प्रदेशच्या 4 तर बिहार 1, राजस्थान 1, दिल्ली 2, हरियाणा 2, कर्नाटक 1, तेलंगाणा 4 आणि यूपीच्या 2 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले. मुलींमध्ये यूपीच्या पाल अग्रवालने 100 टक्के गुण मिळवले आहेत.

13 भाषांत झाली परिक्षा

बहरीनच्या 162 विद्यार्थी लॉकडाऊनमुळे पहिल्या टप्प्यास अनुपस्थित होते. त्यांनी 3 ते 4 ऑगस्टला परिक्षा दिली. यासाठी एकूण 707 पर्यवेक्षक, 293 शहर -समन्वयक, 19 क्षेत्र समन्वयक, 6 विशेष समन्वयक आणि 2 राष्ट्रीय समन्वयक होते. ही परिक्षा इंग्रजी, हिंदी, गुजराती, असमिया, बंगाली, कन्नड़, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगु आणि उर्दू या 13 भाषांत आयोजित करण्यात होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.