नवी दिल्ली : जे उमेदवार आधीच जानेवारी पहिल्या सत्रामध्ये हजर नव्हते. ते त्यांच्या ओळखपत्रासह लॉग इन करू शकतील. आणि एप्रिलच्या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क भरू शकतील. एनटीएने म्हटले आहे की "ज्या उमेदवारांनी सत्र 1 साठी अर्ज केला होता, आणि परीक्षा शुल्क भरले होते, ते सत्र 2 ला उपस्थित राहू शकतात. त्यासाठी उमेदवारांना त्यांचा मागील अर्ज क्रमांक आणि पासवर्डसह लॉग इन करणे आवश्यक आहे. ते फक्त पेपर, परीक्षेचे माध्यम, राज्य कोड निवडू शकतात. पात्रता, पत्ता अपलोड करणे गरजेचे आहे.
कोण अर्ज करू शकतात : नवीन उमेदवार आणि पहिल्या सत्रात असलेले उमेदवार असे दोघेही दुसऱ्या सत्रासाठी अर्ज करू शकतात. सत्र 1 मध्ये उपस्थित असलेल्या उमेदवारांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. ते थेट अर्ज सादर करू शकतात. सत्र 2 साठी अर्ज कसा करावा हे जाणून घेऊयात. एनटीएच्या जेईई अधिकृत साइट jeemain.nta.nic.in वर सर्वप्रथम जा. होम पेजवर उपलब्ध जेईई मुख्य परीक्षा 2023 लिंकवर क्लिक करा. लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिटवर क्लिक करा. अर्ज भरा आणि अर्ज फी ऑनलाईन भरा. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सबमिट वर क्लिक करा. त्याची प्रत डाऊनलोड करा. पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.
नोंदणी 12 मार्च रोजी संपेल : एनटीएच्या जेईई परीक्षा 2023ची नोंदणी प्रक्रिया 12 मार्च 2023 रोजी बंद होईल. उमेदवार एनटीए जेईईच्या अधिकृत साइट jeemain.nta.nic.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. मुख्य जेईई सत्र 2 परीक्षेच्या तारखा 2, 6, 8, 10, 11 आणि 12 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. यासाठी राखीव तारखा 13 आणि 15 एप्रिल आहेत. जेईई मुख्य सत्र 2 परीक्षा 2023 ची नोंदणी आज, 15 फेब्रुवारी 2023 पासून सुरू झाली आहे. परीक्षेसाठी अर्ज करण्याची थेट लिंक jeemain.nta.nic.in आहे. सत्र 1 मध्ये बसलेल्या उमेदवारांना पुन्हा जेईई मेन्ससाठी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. ते लॉगईन करून अर्ज भरू शकतात. जेईई मेन 2023 सत्र 2 नोंदणी लिंक आता jeemain.nta.nic.in सक्रिय आहे. होमपेजवर गेल्यावर सत्र 1 मध्ये उपस्थित नसल्याची नोंदणी करा. कागदपत्रे अपलोड करा, फी भरा. केलेली सर्व पक्रिया सबमिट करा आणि डाउनलोड करा. जेईई मुख्य सत्र 2 एप्रिल 6, 8, 10, 11 आणि 12, 2023 रोजी होणार आहे. सत्र 2 साठी राखीव तारखा 13 आणि 15 एप्रिल आहेत.