नवी दिल्ली: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सोमवारी दुखापतीमुळे आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मधून बाहेर ( Jasprit Bumrah Rulled Out T20 World Cup ) पडला. याबाबत, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी एका निवेदनात पुष्टी केली की, गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून बरा होत असलेल्या रवींद्र जडेजानंतर दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकातून बाहेर पडणारा जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) हा दुसरा खेळाडू आहे. ज्याचा पर्याय शोधणे टीम इंडियासाठी खूप कठीण ठरणार आहे.
28 वर्षीय बुमराहला मागील महिन्याच्या सुरुवातीला पाठीच्या दुखापतीमुळे संघातून आराम देण्याच आला होता. त्याचबरोबर 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी ( T20 World Cup 2022 ) त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी विश्रांती आणि उपचारांचा सल्ला दिला होता. यामुळे त्याला आशिया कप 2022 ( Asia Cup 2022 ) मधूनही बाहेर ठेवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी तो परतला. भारत 2-1 असा विजय मिळवला, पण बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त दिसत नव्हता. दोन सामन्यांत त्याला एकच विकेट घेता आली.
-
NEWS - Jasprit Bumrah ruled out of ICC Men’s T20 World Cup 2022.
— BCCI (@BCCI) October 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
More details here - https://t.co/H1Stfs3YuE #TeamIndia
">NEWS - Jasprit Bumrah ruled out of ICC Men’s T20 World Cup 2022.
— BCCI (@BCCI) October 3, 2022
More details here - https://t.co/H1Stfs3YuE #TeamIndiaNEWS - Jasprit Bumrah ruled out of ICC Men’s T20 World Cup 2022.
— BCCI (@BCCI) October 3, 2022
More details here - https://t.co/H1Stfs3YuE #TeamIndia
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेसाठी बुमराहचाही भारताच्या संघात समावेश करण्यात आला होता, परंतु पाठदुखीच्या तक्रारीमुळे ( Jasprit Bumrah back injury ) तिरुअनंतपुरममधील पहिल्या टी-20 सामन्याला तो मुकला होता. यानंतर तो दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 मालिकेतून बाहेर असल्याची बातमी आली.
भारतासमोर डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजीची मोठी समस्या -
बुमराहच्या बाहेर पडण्याने गेल्या वर्षीच्या कामगिरीत सुधारणा करण्याच्या भारताच्या आशांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. 60 सामन्यांमध्ये 70 विकेट्स घेऊन तो T20I मध्ये भारताचा तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. बुमराह त्याच्या चांगल्या गोलंदाजीसाठी, विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर्ससाठी लक्षात ठेवला जातो. सध्या भारतासमोर डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजीची मोठी समस्या ( Big bowling problem for India in death overs ) आहे. आशिया कप 2022 मधील भारताच्या दारुण पराभवामागे हे सर्वात मोठे कारण असल्याचे मानले जात होते.
-
Speedy recovery to our speedster @Jaspritbumrah93. #TeamIndia https://t.co/yTAntSdDXl
— BCCI (@BCCI) October 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Speedy recovery to our speedster @Jaspritbumrah93. #TeamIndia https://t.co/yTAntSdDXl
— BCCI (@BCCI) October 4, 2022Speedy recovery to our speedster @Jaspritbumrah93. #TeamIndia https://t.co/yTAntSdDXl
— BCCI (@BCCI) October 4, 2022
गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाला ग्रुप 2 मध्ये तिसरे स्थान मिळवून सेमीफायनल गाठण्यात अपयश आले होते. त्यामुळेच यावेळी भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चांगल्या संयोजनासह जाण्याचा विचार करत होता, परंतु दोन टी-20 विशेषज्ञ खेळाडू दुखापतींमुळे संघाबाहेर आहेत, ज्यांची जागी दुसरा पर्याय शोधणे फार कठीण मानले जात आहे.
बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, बोर्डाच्या वैद्यकीय पथकाने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ( Fast bowler Jasprit Bumrah ) आयसीसी टी-20 विश्वचषक संघातून वगळले आहे. बुमराहच्या दुखापतीचे तपशीलवार मूल्यांकन आणि त्याच्या बरे होण्यासाठी लागणारा वेळ आणि तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी लवकरच विश्वचषक स्पर्धेसाठी संघात नव्या खेळाडूचा समावेश करण्यात येणार आहे.
सध्या भारताकडे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ( Fast Bowler Mohammed Shami ), मोहम्मद सिराज आणि दीपक चहर ( Fast Bowler Deepak Chahar )यांसारख्या गोलंदाजांची नावे असून त्यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची पहिली नजर असेल. त्यांच्यापैकी एकाचे नाव घेतले जाऊ शकते, परंतु अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
त्यांचा T20 रेकॉर्ड बघूया -
या विक्रमानुसार, खरी स्पर्धा मोहम्मद शमी आणि दीपक चहर यांच्यात आहे आणि या दोघांनाही टीम इंडियाने राखीव आणि स्टँडबाय खेळाडू म्हणून घेण्याचे ठरवले होते, परंतु पहिल्या 15 खेळाडूंमध्ये त्यांच्यापैकी एकाचा समावेश होता. अतिरिक्त खेळाडूमध्ये दुसऱ्या वेगवान गोलंदाजाला संधी दिली जाऊ शकते.