जमशेदपूर (झारखंड) Road accident in jamshedpur : नवीन वर्षाच्या दिवशी सकाळी झारखंडच्या जमशेदपूरमध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय. तर दोन जण गंभीर जखमी झाले. या जखमींवर टाटा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात बिस्तुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलाय.
6 जणांचा मृत्यू : आरआयटी पोलीस स्टेशन परिसरातील काही लोक कारमधून नवीन वर्षानिमित्त पिकनिकसाठी निघाले होते, असं सांगितलं जातंय. या दरम्यान बिस्तुपूर सर्किट हाऊस चौकाजवळ चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार पलटली. त्यामुळं कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर जखमींवर उपचार सुरू आहेत.
कार उलटल्यानं अपघात : आदित्यपूरच्या आरआयटी पोलीस ठाण्यांतर्गत बाबा आश्रमात राहणारे 8 जण सोमवारी सकाळी 4.30 वाजता कारमधून पिकनिकसाठी जात होते. गाडीचा वेग जास्त होता. यातच कार बिस्तुपूर येथील सर्किट हाऊस चौकाजवळ येताच कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार पलटली. या घटनेची माहिती मिळताच, बिस्तुपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारमध्ये अडकलेल्या लोकांची सुटका केली. कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीनं तिघांना जखमी अवस्थेत टाटा रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सूरज साहू, टुकटुक, शुभम, मोनू, हेमंत आणि छोटू यादव यांचा समावेश आहे. तर हर्ष झा आणि रवी झा अशी जखमींची नावं आहेत. या घटनेची माहिती मिळताच आदित्यपूर येथील आरआयटी बाबांच्या आश्रमात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा :
- डंपरच्या धडकेनंतर पेटली बस; बारा प्रवाशांचा होरपळून मृत्यू, 14 जण गंभीर
- सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर लालपरीचा अपघात, चाकं निखळल्यानं बस पलटली, तीन प्रवासी गंभीर
- नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, आठ जण जागीच ठार, एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश
- भोपाळ गॅस गळती : जगातील सर्वात भीषण औद्योगिक अपघाताला ३९ वर्ष पूर्ण, वाचा त्या रात्री नेमकं काय घडलं?